ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात झालेल्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व नगर येथील प्रसिद्ध साईदीप हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अनिल कुऱ्हाडे हे होते तर माजी विद्यार्थी पुणे येथील उद्योजक रविंद्र मुनोत,प्रविण चुत्तर,खुपटी येथील प्रगतशील शेतकरी फक्कडराव तनपूरे, नेवासा मार्केट कमिटीचे माजी सचिव भाऊसाहेब आगळे,अरुण शास्त्री,ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक जनार्दन पठारे,कै.सौ.सुंदरबाई गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती स्मिताताई पानसरे,पर्यवेक्षक बापूसाहेब चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
ज्ञानोदय’ मध्ये रंगला १९७२ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा..जुन्या आठवणींना मनोगतातून दिला उजाळा
नेवासा ( शहर प्रतिनिधी ):- नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये सन १९७२ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला.डॉक्टर, शिक्षक शेतकरी, अधिकारी, उद्योजक असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.तर शाळेसाठी सर्वांनी मिळून २१ हजाराची देणगी ही दिली.
यावेळी माजी विद्यार्थी अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापक जनार्धन पटारे यांनी शिक्षण संस्थेची सुरू असलेली उत्कर्षमय वाटचाल विषयी माहिती देत सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती स्मिताताई पानसरे यांनी आज पन्नास वर्षे उलटून गेली तरी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल असलेला आदर व्यक्त केला या बद्दल संस्था ऋणी असल्याचे सांगितले .
यावेळी झालेल्या स्नेहमेळाव्याला माजी विद्यार्थी मुकुंद गुजराथी,ॲड.उध्दवराव कार्ले, अनिल ठुबे, अमृत फिरोदिया, सोपानराव चौधरी, ज्ञानदेव ससे,रावसाहेब पेचे, रावसाहेब जपे,विश्वनाथ रेडे, माणिकराव भागवत, ओमप्रकाश नाबरीया, रमेश कपिले,डॉ. हरिभाऊ सुरसे,नगर येथील कडूताई वांढेकर,बदामराव पठाडे उपस्थित होते.
शिक्षक संजय आखाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले तर अरुण मकासरे, गोविंद गायकवाड,अमोल दहातोंडे,सुनंदा राशिनकर, अनिता वालझाडे यांनी स्नेह मेळावा यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पुणे येथील उद्योजक रविंद्र मुनोत यांनी एकवीस हजाराची देणगी देत असल्याचे यावेळी बोलतांना जाहीर केले.माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
{स्नेह मिलनाच्या या भेटीमुळे गेली ५० वर्षे व्यवसाय, नोकरी यामुळे एकमेकांपासून दूर गेलेलो सर्व मित्र एकत्र आलो. शालेय जीवनातील आठवणी,आपण केलेल्या उनाडक्या, शाळेतील गुरुजनांचा आपले जीवन संस्कारक्षम व्हावे याकरिता वेळप्रसंगी त्यांचा खाल्लेला मार, गैरसमजामुळे अनावधानाने एकमेकांशी केलेली मारामारी, सर्वात महत्त्वाचे ज्या पवित्र वास्तुने आपल्याला संस्कारक्षम करून आपापल्या क्षेत्रात यशस्वी केले त्या वास्तुच्या ( भले तिचे रंगरुप बदलले असेल) कुशीत विसावण्याची संधी आपणा सर्वांना मिळाली. थोडक्यात सांगायचे तर आपल्या आयुष्याला जुन्या आठवणींना रुपेरी किनार लावणारा असा हा दिवस होता.} – रविंद्र मुनोत ( माजी विद्यार्थी )