संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर शहरातील प्रवरा नदी पुल ते बस स्थानकापर्यंतचे सर्व अतिक्रमणे आ अमोल खताळ यांच्या निर्देशानुसार नगर पालिका प्रशासनाने काढले होते.मात्र या रस्ता रुंदीकरणाचे काम करणारे ठेकेदार आजारी असल्यामुळे ते काम थांबले होते मात्र माणुसकीच्या भावनेतून संबंधित ठेकेदाराला आ. खताळ यांनी त्यांना काही दिवसाची मुदत दिली गेली होती. मात्र ती मुदत संपल्यानंतर आजपासून या रस्ता रुंदी करणाच्या कामाला संबंधित कंपनी च्या ठेकेदाराने सुरुवात केली आहे. त्या मुळे आ. खताळ यांच्या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संगमनेर शहरातील बस स्थानक ते प्रवरा नदी पुलापर्यंतचे वेगवेगळी कारणे सांगून वर्षानुवर्षे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम प्रलंबित ठेवले होते. मात्र तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर खर्याअर्थाने विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे.पुणे नाशिक या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष निधीतून मंजूर झाले होते. सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात हॉटेल स्टेटस ते संगमनेर बसस्थानकापर्यंत तर दुसऱ्या टप्प्यामध्ये रायतेवाडी आतापर्यंत रस्ता रुंदीकरण झाले त्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा हातभार लागला.
संगमनेर बस स्थानक ते प्रवरा नदी पुलापर्यंत आणि तीन बत्ती चौक ते ज्ञान मातेपर्यंत महामार्गाच्या दुतर्फा झालेले अतिक्रमणे वाहतुकीला अडथळा ठरत होती. त्यामुळे या रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळे येत होते.या अतिक्रमणां च्या बाबतच्या तक्रारी आ अमोल खताळ यांच्याकडे आली होती.त्या तक्रारीची दखल घेऊन आ खताळ यांनी संगमनेर नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन सर्व अनाधिकृत अतिक्रमणे काढून टाका.असे निर्देश दिले. त्यानुसार या तीनही विभागांच्या संयुक्त पथकाने मागील पंधरवड्यात वरील भागात तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवत सर्वच अतिक्रमणे काढून टाकले मात्र केवळ अतिक्रमणे काढून उपयोग नाही तर प्रवरा नदी पूल ते बसस्थानकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबतचे सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या .मात्र कंपनीचा ठेकेदार आजारी असल्यामुळे त्यांनी काही दिवसाची मुदत आ खताळ यांच्याकडे मागितली होती. माणुसकीच्या भावानेतू याला कंपनीच्या ठेकेदाराला काही दिवसाची मुदत दिली होती. तो ठेकेदार आजारातून बरे झाले आहे. त्या मुळे संबंधित कंपनीच्या ठेकेदाराने लगेचच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे त्यामुळे आमदार खताळ यांच्या त्वरित निर्णय घेऊन गतिमान काम करून घेण्याच्या कार्यपद्धतीचे संगमनेरकर नागरिक स्वागत करत आहे.
माणुसकीच्या भावनेतून ठेकेदाराला दिली मुदत
संगमनेर बस स्थानक ते प्रवरा नदी पुलापर्यंत रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू होणार होते, मात्र संबंधित ठेकेदार आजारी असल्याने काहीसा विलंब झाला होता. ठेकेदाराने थोडी मुदत मागितली असता आ अमोल खताळ यांनी त्यास माणुसकीच्या भावनेतून काही दिवसाची मुदत दिली होती .आजारातून तो ठेकेदार बरा झाला असून त्याने अखेर आजपासून या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे.
आ. अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून निकाली निघाला प्रश्न – ॲड. गणपुले
गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर बस स्थानक ते प्रवरा नदी पुलापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम परिसरातील व्यावसा यिकांनी केलेल्या अनधिकृत अतिक्रमणे असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले होते .आ अमोल खताळ यांनी धाडसी निर्णय घेत ही सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले त्यानुसार तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवत अनाधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली आणि अनेक दिवसा पासून रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे . त्यामुळे आ अमोल खताळ यांच्या कामगिरीचे संगमनेरकर कौतुक करत आहे