मुंबई (जनता आवाज न्यूज):-महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची सत्ता आहे. या सत्तेनंतर भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. शिक्षक-पदवीधर, कसबा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश मिळालेलं नाही. भाजप महाराष्ट्रात यश मिळविण्यासाठी धडपड करताे. चिंचवडमध्ये यश मिळाले, परंतु विजयी उमेदवारापेक्षा पराभव झालेल्या पहिल्या दाेन उमेदवारांची मतांची बेरीज ही भाजपपेक्षा माेठी ठरते. यामुळे भाजपच्या पक्षातंर्गत चिंता व्यक्त केली जात आहे. यावर ताेडगा काढण्यासाठी भाजपमध्ये माेठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत पक्षाकडून दिले गेले आहेत.
कसबा पराभवानंतर भाजप पक्षाच्या चिंतन बैठक झाली. यात पक्षाच्या महाराष्ट्रातील भूमिकेवर चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीनंतर भाजपची पुनर्रचना हाेणार असल्याचे सांगितले. बानवकुळे यांनी ही पुनर्रचना कसबा पाेटनिवडणुकीच्या पराभवामुळे हे फेटाळून लावले. भाजपच्या पुनर्रचनेची कार्यवाही लवकरच केली जाणार आहे. या महिन्यात याबाबत कार्यवाही हाेईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. या पुनर्रचनेत काही जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्ष दिले जाणार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यातील पदाधिकारी त्यांच्या भाैगाेलिक राजकीय परिस्थितीनुसार विचार करतात. पक्षाची बांधणी करतात. हा सर्व विचार घेऊन भाजपची महाराष्ट्रातील पुनर्रचना करावी लागणार आहे. या पुनर्रचनेत पक्षाचे काम करणारे कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. निवडणूक जिंकण्याचं लक्ष्य देखील असणार आहे. त्यानुसारच ही पुनर्रचना असणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.