अहमदनगर ( जनता आवाज न्यूज ) :- आशिया खंडातील अग्रणीय आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू मानल्या जाणार्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांची निवड झाली आहे.
दरम्यान बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपद राष्ट्रवादीला व उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले गेले. त्यावेळी महानगर बँकेचे अध्यक्ष व युवा नेते अॅड. उदय शेळके यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. पण दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते.