5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून शुभेच्छा !

लोणी  दि. ७ प्रतिनिधी :-आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समस्त स्त्रीशक्तीला राज्याचे राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी विविध क्षेत्रांसह समाजकारण आणि  राजकारण अशा सर्वच क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रीशक्तीचा अवघ्या महाराष्ट्र भूमीला सार्थ अभिमान असल्याचे आपल्या शुभसंदेशात म्हणले आहे.
 आपल्या महाराष्ट्र भूमीला स्त्रीशक्तीचा अलौकिक वारसा लाभला असून समस्त महिला वर्गाने आजपर्यत यामाध्यमातून अनेक स्तरावर नेहमीच एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जीजाऊ अहील्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वैचारीक वारसा  लाभला आहे.महाराष्ट्राच्या भूमीने  महिला वर्गाचा आदर आणि मान राखतानाच कर्तृत्व गाजविणाऱ्या महीलांना संधी निर्माण करून देतानाच, त्यांच्यामधील कौशल्य आणि कलागुणांना बचत गटाच्या चळवळीतून एक व्यासपीठ देण्याचे काम केले आहे.
 देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनीही देशभरातील विविध क्षेत्रात, योजनात आणि कार्यक्रमात स्त्री शक्तीचा सहभाग वाढविला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये मुलींना प्रवेश देण्यापासून ते संरक्षण दलात महीलांना दिलेली संधी देशातील महीलांच्या सन्मानाचे द्योतक मानले पाहीजे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषी आणि दुग्ध व्यवसायातून बळकट करण्यात महिलावर्गाचे योगदान लक्षणीय असून, त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे अधिकाधिक लाभ मिळू लागल्याने  संधी उपलब्ध होत आहेत. निर्णय प्रक्रीयेत  महिलांचा सहभाग वाढविण्यासोबतच अधिकाधिक संधी, आणि  सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच  स्त्रीशक्तीच्या योगदानाबद्दल  कृतज्ञता व्यक्त करून  राधाकृष्ण विखे पाटील यांनी महीला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!