8.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्सपो २०२३ चे आयोजन दि.२४ते २६ मार्च २०२३

शिर्डी (प्रतिनिधी) :-शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्सपो २०२३ चे  आयोजन दि.२४ते २६ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहीती  महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 प्रदर्शनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या  लोगोचे अनावरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.खा डॉ सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ शीतलकुमार मुकणे प्रादेशिक पशुसंवर्धन आयुक्त बाबुराव नरवाडे  पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सुनिल तुंबारे यांच्यासह शिर्डीमधील पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रदर्शनाच्या संदर्भात माहीती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की देशातील तेरा राज्यातील पशुपक्षी सहभागी व्हावेत असा प्रयत्न आहे.या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्व पटवून देवून देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे,सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालना द्वारे स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे,दूध मांस अंडी उत्पादनास चालना देणे,जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे,लिंग विनिश्चित केलेल्या विर्यमात्राचा कृत्रिम रेतन कार्यक्रमात वापर,वैरण उत्पादनास चालना देणे,मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह या प्रदर्शनात तज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगून विखे म्हणाले की,त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शास्त्रोक्त पध्दतीने पशुपालन करण्यासाठी आवश्यक यंत्रे उपकरणे तसेच पशुसंवर्धनाशी  निगडीत बाबीसाठीच्या उत्पादनाचे स्टाॅल सुमारे ४६ एकराच्या क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार असून,६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्याच्या जाती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.नागपूर येथील महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा यामध्ये सक्रीय सहभाग राहाणार असून या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग या प्रदर्शनात राहील असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परषोतम रुपाला  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना या   प्रदर्शनाच्या निमित्ताने निमंत्रित करण्यात  आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
महापशुधन एक्स्पो हा पशुसंवर्धन विषयातील  नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशुपक्षी पालन करण्यासाठी या व्यवसायात नव्याने येत असलेल्या युवकांना पर्वणी ठरेल असे विखे पाटील म्हणाले.
निळवंडे धरणाचे लोकार्पण आणि श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापन समितीच्या दर्शन रांगेच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापुर्वी निमंत्रण दिले असून राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रधानमंत्र्यांना विनंती केली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!
WhatsApp Group