20.6 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

महानायक अमिताभ बच्चन यांचा शूटिंगदरम्यान अपघात, बरगड्यांना इजा

हैदराबाद | ( जनता आवाज न्यूज ):-महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान अमिताभ जखमी झाले असून एक ॲक्शन सीन शूट करत असताना ही घटना घडली. अमिताभ यांना दुखापत झाल्याने संबंधित सिनेमाचे शूटिंगही रद्द करण्यात आले.
अमिताभ बच्चन हे प्रभासच्या ‘प्रोजेक्ट K’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यात एक अ‍ॅक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. हैदराबादेतील उपचारानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वतःच आपल्या ब्लॉगवर याची माहिती दिली आहे.
अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले, बरगडीच्या पिंजऱ्यातील स्नायू फाटले आहेत. शूटिंग रद्द करण्यात आली आहे. पट्टी बांधली असून, उपचार सुरू आहेत. खूप जास्त वेदना होत आहेत. हलण्यासही त्रास होत आहे. श्वास घेण्यासही त्रास होत आहे. या वेदना कमी करण्यासाठी मला काही औषधी देण्यात आलीत. यातून सावरण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!