सात्रळ, दि. ४ (प्रतिनिधी) : वर्तमानकालीन पाठ्यक्रमामध्ये व्यावसायाभिमुख अध्ययन घटकांचे अध्यापन करणे गरजेचे आहे. भारतीय शैक्षणिक विश्वात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे नव्या युगाची नांदी घडून संतुलित विकास साध्य होईल. शैक्षणिक संकुल ग्रॅज्युएट निर्माण करणाऱ्या फॅक्टरी न होता, पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि विकास हेच एकमेव धोरण प्रवरा राबवत असल्याचे मत मा. मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय भाषा समिति, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार व हिंदी विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय भाषाओं के परिप्रेक्ष्य मे व्यवसायिक एवं विकास शिक्षा : चुनौतिया एवं संभावनाऍ’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. म्हस्के पाटील बोलत होते. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी दिल्ली येथील तकनिकी शब्दावली आयोग पूर्व निदेशक डॉ. उमाकांत खुबालकर, हैदराबाद विद्यापीठाचे प्रो. डॉ. प्रकाश कोपर्डे, परभणीचे डॉ. हनुमंत शेवाळे, डॉ. राजेंद्र सलालकर, मा. श्री. रमेश पन्हाळे, उपप्राचार्या डॉ जयश्री सिनगर, डॉ. दादासाहेब डांगे, डॉ. ऐनुर शेख, डॉ. उत्तम येवले, डॉ. दशरथ खेमनर, डॉ. युवराज मुळ्ये, प्रा. रागिनी टेकाळे, डॉ. सरला तुपे, डॉ. नवनाथ शिंदे इत्यादी उपस्थित होते.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी केले. समन्वयक व हिंदी विभागाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब नवले यांनी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे अहवाल वाचन केले. बिहार दरगंजा येथील डॉ. रश्मी शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले.
आभार उपप्रचार्य डॉ. दीपक घोलप यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अनंत केदारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. राम तांबे, डॉ. निलेश कान्हे, प्रा. हरी दिवेकर, प्रा. दिनकर घाणे, प्रा. आदिनाथ दरंदले, शीला गुळवे यांनी परिश्रम घेतले.