लोणी दि.२( प्रतिनिधी):-अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी काढलेली रांगोळी!कला आविष्कार विद्यार्थ्याचा जल्लोश आणि शिक्षणासोबतचं आपल्या सुप्त कलागुणांना संधी मिळालेल्याने प्रवरेच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी संत महंताची शिकवण, महापुरुषांचे कार्य आणि आत्मनिर्भर भारत,सामाजिक बांधिकी यांतून सोशल इंजिनिअरींगचा संदेश दिला.
प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या फॅन फेअर स्टोल व आर्ट गॅलरीचे उद्घाटन जि प माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते
लोकनेते पद्मभूषण डॉ बाबासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा अभियांञिकी महाविद्यालयाचे गुरुवार पासून वार्षिक स्नेहसंमेलन माजी विद्यार्थांची मीट सह विविध कार्यक्रमाचे प्रारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केला. यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाणे,तंञनिकेतनचे प्राचार्य डाॅ.व्हि आर, राठी,पायरेन्सचे सचिव डाॅ.निलेश बनकर, वार्षिक स्नेहसंमेलनाचे समन्वयक डॉ लक्ष्मण अभंग, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. राहुल हिंगे, माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. सचिन निंबाळकर सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सचिव कु. चौधरी वैष्णवी, विद्यार्थी परिषद अध्यक्ष कु. हर्षदा दिघे, सांस्कृतिक कार्यक्रम सेक्रेटरी कु. दीक्षा रोकडे, जिमखाना सेक्रेटरी श्री. पृथ्वीराज शेळके, एन.एन.एस. प्रतिनिधी श्री. विशाल पाटील, सांस्कृतिक सचिव महिला प्रतिनिधी कु. नेहा शिदे कु. वेदिका खर्डे आदी उपस्थित होते.
तीन दिवसीय कार्यक्रमात ३ मार्च रोजी १९९७ साली उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थांची अल्युमिनी मीट आयोजित केली आहे. पहिल्या दिवशी फनफेअर, एआरटी गॅलरी ३ मार्च २०२३ रोजी पारितोषिक वितरण समारंभ असून कार्याक्रमचे माजी मंञी श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,उपविभागीय अभियंता, छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल मुंबई श्री.श्याम एस. मिसाळ आहेत. तर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रमुख संस्थेचे संचालक माननीय श्री दत्तात्रय शिरसाठ पाटील असणार आहेत.
अभियांञिकीच्या विद्यार्थ्यासोबत मुक्त संवाद साधत सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी त्यांना शुभेच्छा देतांनात त्यांच्या कलागुणांचे कौतुक ही केले.