9.6 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

कृषी प्रदर्शनातून माहिती व तंत्रज्ञानाची ओळख होते- खा.डाॅ.सुजय विखे पाटील

श्रीगोंदा (प्रतिनिधि):-सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्मार्ट कृषी प्रदर्शनातून माहिती व तंत्रज्ञानाची ओळख होत असते त्यामुळेच असे प्रदर्शन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दक्षिण नगरचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले, ते श्रीगोंदा येथील स्मार्ट कृषी प्रदर्शनाच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते. 
    श्रीगोंदा कृषी विभागाच्या वतीने स्मार्ट कृषी प्रदर्शनाचे आयोजन एक मार्च ते पाच मार्च करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमास आमदार बबनराव पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. 
   यावेळी बोलताना ते म्हणाले की अशा कृषी प्रदर्शनातून सर्वसामान्य शेतकऱ्यास पारंपरिक शेती न करता सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शेती सुध्दा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता येते हे प्रात्यक्षिकातून दाखवता येते, आणि शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यायला हवा. उत्पादनावरील खर्च कमी करून नफ्यातील शेती कशी करावयाची या बाबत अशा प्रदर्शनातून जास्तीत जास्त माहिती पोहचावी हीच अपेक्षा आहे. माहिती बरोबरच,मनोरंजन, खवय्यांसाठी नवनवीन पदार्थांची रेलचेल असे सारे काही यातून पाहावयास मिळते, याचा आपण सर्वांनी मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 
 स्मार्ट कृषी प्रदर्शनाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक देखील यावेळी केले.या कृषी प्रदर्शनात पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
पशुधन महाएक्सपोचे 24-26 मार्चला शिर्डीतआयोजन 
  – देशातील सर्वात मोठे पशु प्रदर्शन अर्थात पशुधन महा एक्सपो 2023 या नावाने शिर्डी येथे 24 ते 26 मार्च या दरम्यान पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून भरवले जाणार आहे. याचे उद्घाटन राज्याचे मुख्मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या भव्य पशु प्रदर्शनात देशभरातील विविध जाती,संकरित जातीच्या पशुचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे, या बरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, यासह शेतीला पुरक जोडधंद्यासाठी आवश्यक ती माहिती तज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सत्रातून देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सर्व शेतकरी, कष्टकरी बांधव यांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. सुजय विखे यांनी केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!