कोल्हार ( वार्ताहर ) :- ग्रंथ प्रदर्शन, साहित्य प्रदर्शन, काव्यप्रदर्शन आणि मान्यवरांच्या मनोगताने राहाता तालुक्यातील राजुरी येथील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजय कोळसे, राहाता तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. धनवटे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. काकासाहेब गोरे उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते वरील सर्व प्रदर्शनांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे प्राचार्य सुरेश विखे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय सुहास धावणे यांनी करून दिला. यावेळी हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कु. भक्ती यादव हिने मराठी दिनाचे महत्त्व विशद केले तर कु. तृप्ती कदम या विद्यार्थिनीने ” आयुष्य कसं असतं ” ही स्वरचित कविता सादर करून प्रशंसा मिळविली.
यावेळी पत्रकार संजय कोळसे, ॲड. धनवटे, ॲड. काकासाहेब गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धावणे यांनी केले. माधव पडवळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी पर्यवेक्षक बाळासाहेब नजन, बाळासाहेब घोरपडे, एकनाथ राऊत, भीमराज चिंधे, सौ. मंदाकिनी पांढरकर, सौ. भारती लोखंडे, सौ. सुनिता कदम, उदय ब्राह्मणे, बबन सातकर, माणिक गायकर, कु. जगताप आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.