संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-विजेचा खेळ खंडोबा कोणी केला हे सर्व जनतेला माहित आहे. रोहीत्र जळाल्यावर प्रत्येक वीज कनेक्शनधारक शेतकऱ्यांकडुन. एक हजार रुपयाची वर्गणी घेऊन पोट चालविणाऱ्या स्वयंघोषित नेत्याने आमदार अमोल खताळ यांच्यावर तसेच तालुक्याच्या विकासावरती बोलणे हे बालीशपणाचे लक्षण असल्याची टीका भाजपचे माजी तालुका उपाध्यक्ष शशिकांत मतकर यांनी केली .
संगमनेर तालुक्यात सन २०२४ पर्यंत काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून दिले होते.त्यात या तालुक्यात ३० ते ३५ वर्षे मंत्रीपद होते.त्यात ही ४० वर्षे या तालुक्याचे माजी लोकप्रतिनिधी यांच्या कुटुंबाकडे सत्ता आहे.उलट एकाच परिवाराला सत्ता दिल्याने गावागावामध्ये दलाल व ठेकेदार संभाळले.त्यांनी तालुक्यातील नद्या मूरुम रेती संपविली.एवढेच नव्हे तर अनेक कार्यालयांमध्ये दलाल पोसले.त्यांनी तालुक्यातील विकासावर बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहे २०२२-२३ मध्ये गट फेररचना झाली अन निमज संगमनेर खुर्द गटाला जोडले. तेव्हा झोपलेले स्वयंघोषित पुढारी आता जागे झाले . ज्यांनी सर्व सत्ता असताना रोजगार निर्मिती केली नाही.उलट उद्योगधंदे अडचणीत यावे म्हणून प्रयत्न केले. रेल्वेसाठी प्रयत्न केले नाही.उलट रेल्वेमुळे गुन्हेगारी वाढली.जिल्हा झाला तर अनेक समस्या निर्माण होतात.ही भूमिका घेतली.तेच लोकप्रतिनिधी आता जनतेने नाकारल्यावर त्यावर बोलणे योग्य नाही . तालुक्याचा विकास म्हणजे कोणाचा विकास झाला हे एकदा जनतेला समजून सांगावे.ज्यांना ग्रामपंचायत व्यवस्थित सांभाळता येत माही ते आ.अमोल खताळ यांचेवर टिका करायला लागले. निसर्ग निर्मीत नद्यांचे काठ वगळता तालुक्याचा दौरा करा मग ४०वर्षे काय विकास केला ते समजेल.उलट आ खताळ यांनी आमदार झाले पासुन माफियाराज बंद झाले तालुका दहशदमुक्त झाला तसेच.वीजेचा लपंडाव कमी झाला.नद्यांचे लचके तोडणे बंद झाले.शासकीय कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट संपला म्हणून ही आगपाखड होत आहे.
सत्तेचा गैरवापर कसा करावा हे काँग्रेस पुढा-याकडुन शिकले पाहिजे.निमज गावची सर्व सत्ता स्थाने स्वतः जवळ असल्याने वनविभागाच्या सर्व जमीनीवर यांच्या वहीवाटी आहे.अनेक वेळा तक्रार करुनही अतिक्रमणे निघाली नाही. याच गावातील सरस्वती पतसंस्थेची बिगर शेती जागा शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत बेकायदेशीरपणे कागदपत्रे तयार करुन बळकाविण्यासाठी मदत करणे. शासनाने भुमीहिन दिलेल्या जमीनीवर संस्थेचा ताबा दाखविणे व अतिक्रमण केलेल्या जमीनी नातेवाईक यांचे ताब्यात ठेवणे.सर्व सत्ता ताब्यात असताना कामगार तलाठी कार्यालय गावात सूरु होऊ नये म्हणून काम करणारे पुढारी गावच्या विकासाला लागलेली कीड आहे हे जनतेला कळले असुन त्यांचा आता गावच बंदोबस्त करील .
– शशिकांत वसंतराव मतकर.
(माजी उपतालुका अध्यक्ष भाजपा) ,



