spot_img
spot_img

अखेर अनधिकृत जागेवरील मशीद हलविली

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा) : –नगर-मनमाड महामार्गावर कोल्हार व कोल्हार खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या पुलांमधील अनधिकृत जागेवरील मशीद पाडण्यात आली. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कोल्हार व कोल्हार खुर्दच्या दोन पुलांमधील मशीद स्वतःहूनन पाडली आहे.

भारतीय राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणाकडून बजावलेल्या अतिक्रमण संबंधित नोटिसच्या अनुषंगाने सकारात्मक प्रतिसाद देत नगर-मनमाड महामार्गावर कोल्हार व कोल्हार खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या पुलांमधील अनधिकृत जागेवर बऱ्याच वर्षापासून असलेली मशीद सरकारी अधिकारी तसेच पोलीस बंदोबस्तात स्वतःहून पाडण्यास सुरुवात केली.

याआधीच कोल्हार येथील जागेवरील व्यापारी तसेच घरे असलेल्या सर्वांनी स्वतःहून जागा खाली करण्याची तयारी दाखवली. त्याच पार्श्वभूमीवर दोन पुलांमधील मशीद स्वयंस्फूर्तीने पाडण्या संदर्भातली भूमिका स्वागतार्य आहे.

सदर कारवाई प्रसंगी राहुरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल पवार, कोकाटे व जायभाय तसेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड, आलोक कुमारसिंग, महेश कुमार मिश्रा यांच्यासह अभियंता अजिंक्य हजारे व संकेत बीचकुल उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!