spot_img
spot_img

राष्ट्रीय श्रीराम संघ राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग शिवसेनेत दाखल..

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत निदे यांच्या उपस्थितीत आणि संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी अनेक पदाधिकारी व युवा कार्यकत्यांसह प्रवेश केला. 

यावेळी या सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करून सत्कार केला.

या सोहळ्यात राष्ट्रीय श्रीराम संघाचे आकाश बेग, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, राष्ट्रीय श्रीराम संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत शेटे, प्रकाश मेहेत्रे, उभाठा  गटाचे माजी नगरसेवक सागर शिंदे, अशोकराव तुपे, राहुल धायगुडे, रोहित यादव पाटील, शहरप्रमुख विशाल जाधव, तेजस मोरगे, सुनिल पवार, गणेश दिवसे आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!