8.1 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

बुरुडगाव कचरा डेपोमधील प्रकल्पात शॉर्टसर्किटमुळे लागली आग  महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने आग आणली आटोक्यात

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा): – महानगरपालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोतील प्रकल्पाजवळ शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग नियंत्रणात आणली आहे. आगीमध्ये प्रकल्पाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ठेकेदार संस्थेमार्फत लवकरच त्याची दुरुस्ती होऊन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

बुरुडगाव कचरा डेपो मध्ये असलेल्या एका डीपीजवळ शॉर्टसर्किट झाला. तेथून प्रकल्पापर्यंत जाणारी विद्युत वाहिनी जळाल्याने प्रकल्पाच्या पॅनलमध्ये आग लागली. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. आग आटोक्यात आली आहे. आगीत प्रकल्पातील मशीनच्या काही पार्टचे नुकसान झाले आहे. त्याची दुरुस्ती केली जाणार आहे.

त्यानंतर लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केले जाईल. बुरुडगाव कचरा डेपो येथे सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. त्यात आगीच्या घटनेचे फुटेज असून, त्याची तपासणी करण्यात येत आहे. शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे व या घटनेबाबत पोलिसात नोंद करण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!