9.6 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहाता बाजार समितीत सोयाबीनचे साडेपाच कोटी मंजूर -ना.राधाकृष्ण विखे पाटील

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा):-सोयाबीन आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातील ५९६ शेतकऱ्यांनी ५ कोटी ८९ लाख रुपयांची १२ हजार ४४ क्विंटल सोयाबीनची विक्री केली असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारने आधारभूत किंमतीने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी बाजार समिती मध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोयबीन केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रात १८ नोव्हेबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत सोयाबिन खरेदी करण्याचा कालावधी ठेवण्यात आला होता.

मात्र शेतकर्यांकडे सोयाबीनचे उत्पादन अधिक असल्याने केंद्राला मुदत वाढ मिळावी आशी मागणी करण्यात येत होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकाकडे पाठपुरावा करून सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळावी म्हणून प्रयत्न केले होते.

सोयाबीन खरेदीसाठी ६जानेवारी २०२५ पर्यत मिळालेल्या मुदतवाढीचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. तालुक्यातील ५९६ शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या केंद्रात १२हजार ४४ क्विटंल सोयाबीन विक्री केली.सरकारने ठरवून दिलेल्या ४हजार ८९२ रूपये आधारभूत किंमती प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात ५कोटी ८९ लाख रुपये जमा झाले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बाजार समितीने खरेदी केंद्राची उभारणी डाॅ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली होती.केंद्रावर सुयोग्य नियोजन झाल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करताना कोणतीही अडचण येवू नये म्हणून सभापती उपसभापती आणि संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले होते.

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे.किसान सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला असून केंद्र सरकार प्रमाणेच राज्यातील महायुती सरकारने नमो किसान सन्मान योजना करण्याचा निर्णय घेतला आहे.याचे अनुदान वाढवून देण्याची घोषणाही करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!