लोणी (प्रतिनिधी ):-संगमनेर तालुक्यातील चिचंपूर येथील मे सुर्यभान पाटील तांबे अॅन्ड सन्स या हिन्दुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन या पेट्रोल पंपावर प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात सत्याहतर रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रुग्णालयात गरजु रुगणांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सामाजिक बांधिलकीतून पदमश्री विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे यांच्या मार्गदर्शना खाली रक्तदान शिबीराचे आयोजन शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या वेळी ज्ञानेश्वर विखे,प्रवरा बॅंकेचे संचालक गिताराम तांबे, भानुदास तांबे ,अॅड दिलीप निघुते,ऋषिकेश तांबे,भुषण विखे,दिपक धावणे,श्रीराम दिघे,तात्या घुले,गणेश खेडके, अक्षय मगर,अजिंक्य तांबे,बाबा पवार,सुभाष मगर ,समीर तांबे,संदिप तांबे,डाॅ राहुल कडु,कृष्णा कडु,लक्ष्मीकांत असावा,सिध्दांत मिसाळ,कुणाल तांबे,बापु तांबे,प्रसाद तांबे सह सत्याहतर रक्तदात्यांनी रक्तदान केले. पेट्रोल पंपावर.सामाजिक बांधिलकीची जान ठेवत रक्तदान शिबीराचे आयोजन केलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.