कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):-प्रवरेत शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्याने सामान्य जनतेच्या आयुष्यात समृद्धी आली आहे. प्रवरा परिसरातील शैक्षणिक संस्थेच्या जाळ्यामुळे आज प्रवरा परिसर हा शिक्षण क्षेत्रात अव्वल स्थानावर असून शहरी भागाचे विद्यार्थीही आज प्रवरेत सुरक्षित कॅम्पस म्हणून शिक्षणासाठी येत आहे. हाच प्रवरेचा अभिमान आहे. गरीबातला गरीब विद्यार्थी शिक्षणातून पुढे जावा हाच संस्थेचा प्रयत्न असून यासाठीच विखे पाटील परिवार हा कायमच प्रयत्नशील असतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात सौ विखे पाटील बोलत होते बोलत यावेळी यावेळी प्रवरास सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खर्डे, माजी अध्यक्ष अशोक शेठ असावा, साहेबराव दळे, दत्तात्रय खर्डे , संभाजी देवकर, ऋषिकेश खांदे, आबासाहेब राऊत, बाबासाहेब दळे, दत्तात्रय राजभोज, प्रकाश खर्डे, शिवाजी दातीर, विनोद गुगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर, उपप्राचार्य डॉ. प्रतिभा कानवडे, डॉ. राजेंद्र वडमारे प्रा. राहुल उबाळे डॉ. एस एन डाळिंब, डॉ. प्रकाश पुलाटे आदींसह विद्यार्थी पालक आणि प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. विखे पाटील म्हणाल्या ग्रामीण विद्यार्थी हा सर्व क्षेत्रात परिपूर्ण विद्यार्थी असतो त्याला योग्य दिशा देण्याचे काम प्रवरा शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून होत आहे. यामुळेच आज प्रवरेचे विद्यार्थी हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत आणि ते विद्यार्थी जेव्हा वेळोवेळी आपल्याला भेटतात तेव्हा खऱ्या अर्थाने च्या कर्तुत्वाने आपली मान उंचावत असते. प्रवरेने सामाजिक बांधिलकी ही जपली आहे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आणि शासकीय योजनेतून मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रवरा ही कायमच प्रयत्नशील असते. कमवा आणि शिका योजना असेल किंवा कोविड काळात जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोविड काळात दिलेली फी सवलत असेल या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत आहे. आज शेतकरी सामान्य जनतेची मुले ही शिक्षणातून जात कुटुंब समृद्ध होत आहेत हा आनंद मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भास्करराव खर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रवरा शैक्षणिक संकुलामध्ये ही तिसरी पिढी शिक्षण घेत आहे. परंतु या संस्था उभ्या राहत असताना यासाठी केलेला त्याग हा प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घेण्याची गरज आहे. शिक्षण संस्था मोठ्या होत असताना या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज जगाच्या पाठीवर पोहोचले आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्थेची आणि परिसराची मोठी प्रगती झाली आहे. पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून कायमच सामाजिक बांधिलकी ही जपली आहे. संस्थेच्या माध्यमातून के जी ते पी जी चे शिक्षण दिले जाते. संस्था उभ्या रहात असताना शेतकरी सभासद यांच्या हितासाठी संस्थेमध्ये संस्थेमध्ये २० टक्के आरक्षण हे त्या काळात पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील यांनी दिले होते. परंतु आता सीईटी नीट आणि जेई यामुळे हे आरक्षण देता येत नसले तरी हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याला प्रवरेच्या माध्यमातून कायमच आधार दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकांमध्ये प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती देत असतानाच विविध उपक्रम विद्यार्थी हा सक्षम कसा घडवला,प्रवरा स्पर्धा केंद्रआचार्य चाणाक्य कौशल्य केंद्र त्याचबबोरबर यावर्षी १५० विद्यार्थ्याना नोकरी उपलब्ध करुन दिली आहे. अहवाल वाचन डॉ. एस. एन. डाळिंबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार आहेर आणि प्रा. मनीषा वडीतके यांनी तर आभार डॉ. प्रतिभा कानवडे यांनी मानले.