9.6 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिर्डी विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी १३६७ कोटी रुपये निधी मंजूर- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई ( जनता आवाज वृत्तसेवा):-विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी १३६७  कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्या कामांना वेगाने सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत २०२५  चा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली.

सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा मिळाला होता. आता विमानतळाच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करत लवकरच नाईट लँडिंग सुविधाही सुरू केली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

शिर्डी हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने या विमानतळाच्या विकासामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. विस्तारित सुविधांमुळे देशभरातील प्रवाशांसाठी हा विमानतळ अधिक कार्यक्षम आणि सुटसुटीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!