करंजी( जनता आवाज वृत्तसेवा ):- पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक अंदाजे( वय वर्ष ३५) या तरुणाचा मृतदेह सोमवारी त्यांच्याच शेतामध्ये बेवारसपणे कुटुंबियांना आढळून आला आहे.
मयत कुटुंबातील व्यक्तीने या घटनेची माहिती तात्काळ पाथर्डी पोलिसांना दिली त्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे घटनास्थळी पोहोचले.
काही वेळातच त्या ठिकाणी डीवायएसपी सुनील पाटील यांनी देखील भेट दिली व या घटनेबाबत पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या. मयत सोमनाथ पाठक याच्या डोक्याला व पायाला जखमा असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना दिसून आल्याने मारहाणीमध्ये सोमनाथचा खून झाला आहे का ? त्यादृष्टीने पाथर्डी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. वरिष्ठांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर या ठिकाणी श्वानपथक, ठसे तज्ञ यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. बालरोग तज्ञ डॉक्टर अशोक पाठक यांचा सोमनाथ धाकटा भाऊ होता.
सोमनाथच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा तपास आता पोलीस करणार आहेत.या प्रकारासंदर्भात सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.