राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा) :-फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शिर्डी येथे नुकतीच संपन्न झाली या सभेत अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोशिएशन संघटनेच्या अध्यक्षपदी राहाता येथील डॉ. के वाय गाडेकर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ स्वाधीन गाडेकर यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आहे.
फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स वअहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनची सन २०२५ ची वार्षिक सर्वसाधारण सभा फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांचे अध्यक्षते खाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या सभेसाठी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातून पेट्रोल पंप डीलर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावेळी पेट्रोल पंप चालकांच्या विविध समस्यांवर मंथन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने कमिशन वाढ, ऑइल विक्री तसेच पेट्रोल डिझेल च्या डेपो मधून होणारा पुरवठा या विषयांवर सविस्तर चर्चा पार पडली.तदनंतर अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्षपदी ॲड. श्रीहर्ष शेवाळे, सचिव म्हणून विजय कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सर्व डीलर्स च्या वतीने नूतन जिल्हाध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान
आगामी पाच वर्षासाठी फामपेडाचे नूतन अध्यक्ष म्हणून नागपूर येथील अमित गुप्ता यांची तर अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून राहाता येथील धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. स्वाधीन गाडेकर यांची सर्वानुमते निवड घोषित करण्यात आली.
तर फामपेडाचे सचिव पदी सुदर्शन पाटील, खजिनदरपदी अमोल रेनोसे, सहखजिनदार पदी मुस्तफा होसनजी यांची निवड करण्यात आली उर्वरित जिल्ह्यातील उपाध्यक्ष म्हणून राजु मुंदडा, मुफद्दल अमीन,भूषण भोसले,सुरेश पाटील,रोहन देसाई,रमेश भूत,आशिष देसाई,आसिफ झहीद,केशव ठाकरे, वीरेन पटेल,दिनेश सोनवणे,जितिक्षा शहा, ध्रुव रुपारेल यांची निवड करण्यात आली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील बीपीसीएल,एचपीसीएल, इंडियन ऑईलच्या सर्व डीलर्सचा सहभाग घेऊन फेडरेशनचे राज्य अध्यक्ष उदय लोध यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली आगामी काळात नगर जिल्ह्यातील पेट्रोल डीलर्सचे संघटन अधिक मजबूत करणे तसेच पेट्रोल पंप व्यावसायिकाला येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल. लवकरच उपाध्यक्ष श्रीहर्ष शेवाळे व सचिव विजय कदम यांना सोबत घेऊन संपूर्ण नगर जिल्ह्याचा दौरा करून नवीन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ गाडेकर यांनी सांगितले
यावेळी अजित काकडे यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या निवडीचे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील, फेडरेशनचे अध्यक्ष उदय लोध, अमित गुप्ता, सुदर्शन पाटील, विजय ठाकरे, चारुदत्त पवार, अनिल ओबेरॉय, डॉ.प्रकाश सारडा, राजेंद्र कोठारी व अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेल्या सर्वच डीलर्सनी अभिनंदन करून भावी वाटचालीस गाडेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत