कोपरगाव-(जनता आवाज वृत्तसेवा):-मुंबई-नागपूर महामार्गावरील एस. जे. एस. हॉस्पिटलजवळ आज सकाळी ११ वाजता भीषण अपघात झाला असून यात भरधाव असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ (एम.एच.१२ एन.झेड.००५७) ही मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जात असताना तिच्यावर चालकाचे असलेले नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सदर वाहन साई जनार्दन हॉटेलजवळील गोदावरी स्टॉलमध्ये घुसली आहे.या दुर्घटनेत सुनंदा साबळे नावची एक महिला (वय-५६) मृत तर एक जण ह.भ.प. सुदाम काशिनाथ साबळे व त्यांची भावजय अलका वसंत साबळे हे दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
समृध्दी महामार्ग पूर्ण झाल्याने त्यामार्गावर अवजड वाहनांची गर्दी वाढली आहे. तर त्या त्यापाठोपाठ जुना मुंबई-नागपूर राज्य मार्गाचे काम पूर्ण झाल्याने व त्यावर अवजड वाहनांची वर्दळ कमी झाल्याने या मार्गावरील छोट्या वाहानांची वर्दळ वाढली असली तरी ती फार या संज्ञेत मोडत नाही परिणामी या मार्गावर छोटी वाहने भरधाव वेगाने धावत असतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. अशीच घटना आज सकाळी कोपरगाव बेट भागात घडली आहे. यातील वरील क्रमांकांची पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ ही गाडी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना एका क्षणी त्यावरील चालकाचे तिच्यावरील नियंत्रण सुटले असुंत सदर गाडी थेट रस्त्यालगत असलेल्या साई जनार्दन हॉटेल जवळ असलेल्या एका टपरीत घुसली आहे. त्यावेळी त्या टपरित असेलल्या टपरी चालक आकाश विलास गोंदकर याने सावधानता दाखवत तात्काळ दुकानातून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. त्याची अवस्था काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी होऊन त्याचा जीव वाचला आहे.
मात्र या अपघातात एक महिला सुनंदा साबळे या संवत्सर येथील महिला उपचारा दरम्यान मयत झाली असल्याची माहिती हाती आली आहे. त्यावेळी तिचा फिर्यादी मुलगा हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करताना ही खबर त्याला मिळाल्याने त्याला सदर फिर्याद सोडून आईकडे धाव घ्यावी लागली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.