19.3 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिंदे -फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार : खा डॉ सुजय विखे पाटील

जामखेड (प्रतिनिधी) :-शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले आहेत.जामखेड तालुक्यातील अरणगांव, पिंपरखेड, जामखेड मध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा तसेच जामखेड- सौताडा राष्ट्रीय (५४८डी)  या महामार्ग कामांचा शुभारंभ दक्षिण नगरचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाला.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा शब्द दिला त्याच शब्दाची वचनपूर्ती सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगताना मागील तीन वर्षांत आपल्या राज्यात आघाडीचे सरकार असल्याने आपल्या कडे या योजनेंतर्गत काम होऊ शकले नाही, मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच अवघ्या तीन महिन्यांत जलजीवन मिशनचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आणि नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ देखील सुरू झाला असे सांगितले. आपले सरकार असल्यावर हा फायदा होतो असे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून येणारया निवडणुकांत या सर्व गोष्टींचा विचार आपण जरूर करावा.
जामखेड तालुक्यातील अरणगाव ,पिंपरखेड येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना, विविध विकास कामे, तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा आमदार राम शिंदे हे होते.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अजय काशीद,अंकूश राव ढवळे,सरपंच अंकुश शिंदे,सोमनाथ पाचर्णे, उपसरपंच अविनाश गायकवाड, करण ढवळे, नवनाथ गोमशे,सुरेश कदम,राजेंद्र ननावरे ,रवींद्र सुरवसे,डॉ सोनवणे,अजित यादव ,रमजान शेख, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,यांच्या सह सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून ओव्हरलोड डीपी बदलून देऊ अशी आपणास मी ग्वाही देतो. केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार आहेत तसेच कर्जत जामखेड मतदारसंघात देखील डब्बल इंजिन सरकार आहे.. मतदारसघांतील प्रश्न सोडवण्याचा  आमचा मानस आहे.तसेच मतदरसंघांतील सर्व घटकांना न्याय देऊ असा विश्वास  डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त  केला.
यावेळी माजी मंत्री प्रा. आमदार राम शिंदे यांनी आपले विचार व्यक्त करून शिंदे फडणवीस सरकार किती फायद्याचे आहे हे सांगितले. पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदीजी यांना विराजमान करावे असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या कार्यक्रमात  खा. विखे म्हणाले की गोरगरीब जनतेचा सातत्याने केवळ विचार नाही तर त्याकरिता चांगली योजना आखून ती लाभार्थां पर्यंत पोहचविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  अहोरात्र काम करत असतात, एवढेच नाहीतर ज्या जेष्ठ नागरिकांना त्यांची मुले विचारात नाही अशा जेष्ठ नागरिकांचा ही मोदींनी विचार करून त्यांच्यासाठी देखील राष्ट्रीय वयोश्री ही योजना कार्यान्वित केली, आणी ती यशस्वीपणाने राबवली. या योजनेतून अहमदनगर जिल्ह्यास 42 कोटी रूपयांचा निधी आला आणि जिल्ह्य़ातील हजारो जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता आला, वीस हजार रूपयांचे जेष्ठ नागरिकांचे साहित्य एका एका जेष्ठ नागरिकास यास या योजनेच्या माध्यमातून मिळाले आहे असे सांगून ते म्हणाले की सर्व समावेशक आणि सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन मागील आठ वर्षांपासून मोदी हे काम करत आहेत . अशा नेत्याला आपण ही पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान   करावे असे आवाहन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा आमदार राम शिंदे हे होते
शासन आपल्या दरी या योजने अंतर्गत महाराजस्व अभियान नियोजन बैठक खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थिती जामखेड तहसील कार्यालयात संपन्न झाली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!