जनता आवाज न्यूज
राहाता (प्रतीनिधी) : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात राहाता येथे सर्व पक्षीय धरणा आंदोलन करण्यात करण्यात आले या वेळेस बोलताना राहाता तालुका भाकप चे सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी सांगीतले कि शहीद पानसरे यांची सोळा फ्रेब्रुवारी दोन हजार पंधराला कोल्हापूर मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडून हत्या केली त्या मध्ये कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी जखमी झाला त्यातच विस फ्रेब्रुवारी ला रात्री अकरा वाजता कॉ . गोविंद पानसरे यांचे ब्रिच कॅन्डी रुग्णालय मुंबई येथे निधन झाले व त्यांच्या पत्नी बचावल्या.
त्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषद घेऊन एक महिन्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळू असे सांगीतले परंतु आज आठ वर्ष उलटून देखील गुन्हेगार मोकाट आहे . त्याना पकडण्यात प्रशासनास यश आले नाही किंबहुना त्यांना पकडण्याची विच्छा नाही असे आम्हाला वाटते हे सर्व संशयास्पद आहे. गुन्हेगाराना त्वरीत पकडून फाशीची सजा व्हावी अशी संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेची ईच्छा आहे.
आठ वर्ष झाले गुन्हेगार सापडत नाही हि पुरोगामी महाराष्ट्राला शोभनारी गोष्ट नाही.
तेव्हा आम्ही सर्व विद्यमान गृहमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या धरना आंदोलनाच्या माध्यमातून सांगु इच्छीतो जर शहीद पानसरे यांचे मारेकरी सापडत नसतील तर तुम्ही राजीनामा द्या गृहखात काय करत तुम्ही कसा काय कारभार पाहता.
या वेळेस कॉम्रेड गोवींद पानसरे यांची जन्मभुमी कोल्हार मधून अनेक नागरीक महीला यांची आपल्या संप्तत भावना बोलून दाखविल्या.
सदर निवेदनावर राष्ट्रवादीचे नेते अँड सुरेंद्र खर्डे पा., लोणी खुर्द चे सरपंच जनार्धन घोगरे पा., प्रा कॉ एल एम डांगे, कॉ . कानिफ तांबे, रोहीत कदम ,बाबा शेख, श्रीधर आदीक यांच्या सह्या आहेत.
जयश्री गुरव, संगीता गायकवाड, विमल भोसले, सोनाली शेजुळ ,शशीकला गायकवाड यांनी आपल मनोगत व्यक्त केले.
शिर्डीचे प्रांतअधिकारी साहेब यांनी निवेदन स्विकारून तुमच्या भावना शासनापर्यंत पोहचवितो असे सांगीतले.