शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-आज म्हणजेच १३ मार्च २०२५ रोजी रात्री होलिका दहन केल्यानंतर उद्या १४ मार्च रोजी धूलिवंदन साजरे केले जाईल.धार्मिक ग्रंथांनुसार, होलिका दहनाच्या आधी होलिका मातेची पूजा केली जाते. या काळात भगवान नरसिंहांची आरती करण्याची परंपरा आहे. ते खूप शुभ मानले जाते.
ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितले की, होळीच्या दिवशी भगवान नरसिंहाची आरती करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि घरात सुख-समृद्धी वाढते.
होलिका दहन – होलिका दहन १३ मार्च रोजी केले जाईल. यासाठी सर्वात शुभ वेळ रात्री ११:२६ ते १२:३० पर्यंत असेल. याशिवाय आपल्या सोयीनुसार सायंकाळी पूजा करावी.
नरसिंह आरती –
ओम जय नरसिंह हरे, प्रभु जय नरसिंह हरे।
स्तंभ फाड़ प्रभु प्रकटे, स्तंभ फाड़ प्रभु प्रकटे, जनका ताप हरे॥
ओम जय नरसिंह हरे
तुम हो दिन दयाला, भक्तन हितकारी, प्रभु भक्तन हितकारी।
अद्भुत रूप बनाकर, अद्भुत रूप बनाकर, प्रकटे भय हारी॥
ओम जय नरसिंह हरे
सबके ह्रदय विदारण, दुस्यु जियो मारी, प्रभु दुस्यु जियो मारी।
दास जान आपनायो, दास जान आपनायो, जनपर कृपा करी॥
ओम जय नरसिंह हरे
ब्रह्मा करत आरती, माला पहिनावे, प्रभु माला पहिनावे।
शिवजी जय जय कहकर, पुष्पन बरसावे॥
ओम जय नरसिंह हरे
होलिका पूजन मंत्र
होळी मंत्र- ॐ होलिकायै नम:
परमभक्त प्रह्लादासाठी मंत्र- ॐ प्रह्लादाय नम:
भगवान नरसिंहासाठी मंत्र- ॐ नृसिंहाय न
ज्योतिष शास्त्रानुसार, होळीमध्ये आपण काही अर्पण करत असतो तेव्हा खालील या मंत्राचा जप करणं शुभ फळदायी मानले जाते.
अहकूटा भयत्रस्तैः कृता त्वं होलि बालिशैः। अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम्।