श्रीरामपूर(प्रतिनिधी): एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणा-या श्रीरामपूर नगरपरिषदेसाठी पुरेसा निधी नसल्याने महत्वाची विकासकामे रखडली आहेत. त्यासाठी वैशिष्ट्यपुर्ण योजनेतुन 25 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी मुख्यंमत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा करुन ज्या प्रलंबित विकास कामांसाठी निधीची तातडीने आवश्यकता आहे अशा नगरपरिषद हद्दीतील प्रमुख नाल्यांचे आर.सी.सी. बांधकामासाठी रु. 5 कोटी, नगरपरिषद मालकीच्या विविध इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 2 कोटी, नगरपरिषद इमारतीच्या नुतनीकरणासाठी 3 कोटी, शहराच्या विविध प्रभागातील उद्यान विकासासाठी व हरित पट्टे विकासासाठी रु. 2 कोटी, नगरपालिका हद्दीत व्यापारी संकुल बांधकामासाठी 2 कोटी, प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी 2 कोटी, नगरपरिषदेच्या अपुर्ण मिनी स्टेडियमच्या उर्वरित बांधकामासाठी 5 कोटी आणि नगरपरिषद हद्दीत फायर स्टेशन बांधण्यासाठी रु. 2 कोटी अशा 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आ.लहुजी कानडे यांनी केली आहे.
वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गतच आमदार लहू कानडे यांनी मागील वर्षी शहरांतर्गत रस्त्यांसाठी 5 कोटींचा निधी आणला होता. त्यातीळ कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच याअगोदरही श्रीरामपूर नगरपरिषदेसाठी रु. 12.50 कोटी रुपयांचे रस्ते आ. लहू कानडे यांनी केलेले आहेत.याशिवाय आठ ठिकाणी ओपन जिम (खुले व्यायाम साहित्य) उभारण्यात आले असून त्या त्या भागातील आबालवृध्द, शालेय विद्यार्थी त्याचा आनंद घेत आहेत. मुख्याधिकारी श्रीरामपूर यांच्याशी चर्चा करुन कॅनॉलने येणारे कचरामिश्रीत पाणी साठवण तलावात जाऊ नये म्हणून ज्या ठिकाणावरुन पाणी साठवण तलावाच्या पाईप लार्इन मध्ये जाते, त्याचठिकाणी अत्याधुनिक फिल्टर सिस्टम बसावण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना नगरपरिषद प्रशासनाला करण्यात आल्या असून त्यासाठी आवश्यक असणारा संपुर्ण खर्च आमदार निधीमधुन करण्यात येणार आहे असेही आमदार लहू कानडे यांनी सांगितले आहे.