18.3 C
New York
Sunday, September 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

विरोधी बाजूने जाणाऱ्या वाहनाचा धक्का लागल्याने कमान कोसळली महायुतीच्या वतीने कमानीला धक्का देणाऱ्या वाहनाचा शोध सुरू

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर शहरातील बसस्थानक जवळ महायुतीच्या वतीने उभारण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या कमानीला विरोधी बाजूने जाणाऱ्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे ही कमान कोसळली .छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा कुठल्याही प्रकारे अपमान होऊ न देता महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अवघ्या १५ ते २० मिनिटात कोसळलेली कमान बाजूला केली .त्या कमानीला धक्का देणाऱ्या वाहनाचा महा युतीचे कार्यकर्ते शोध घेत आहे.

संगमनेर शहरात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहामधते साजरी झाली .या उत्सवाच्या निमित्ताने बसस्थानका समोर महायुतीच्या वतीने भव्य दिव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त शहरातून मिरवणुक निघाली होती या मिरवणुकीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. आणि विरोधकांच्या मिरवणूकिकडे शिवप्रेमींनी पाठ फिरवली त्यामुळे विरोधक तोंडघशी पडले मात्र त्यांच्याकडे राजकारणासाठी काही शिल्लक राहिले नसल्यामुळे त्यांनी आता वाहनाच्या धक्क्याने कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमानीवर राजकारण सुरू केले आहे हे दुर्दैव आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बसस्थानका जवळ उभारलेल्या स्वागत कमानीला बस स्थानकाजवळून विरोधी बाजूने जाणाऱ्या वाहनाचा धक्का लागला असता ती कमान कोसळली हे समजतात बस स्थानकाजवळ असणारे महायुतीचे कार्यकर्ते तात्काळ तिथे गेले आणि कोसळलेली कमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र कुणाच्या पायाखाली येणार नाही याची महायुती च्या कार्यकर्त्यांनी दक्षता घेत अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात कोसळलेल्या कमानीचे फ्लेक्स बाजूला केले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला नाही विरोधकांना राजकारणासाठी कुठलेच मुद्दे शिल्लक राहिले नसल्यामुळे त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या कमानीचे राजकारण सुरू केले असल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.

गेली 40 वर्षात विरोधकांना छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कधीही साजरी करण्याचे सुचले नाही. मात्र या तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार आणि तिथीनुसार होणारी शिवजयंती महायुतीने साजरी केली आणि दोन्ही मिरवणुकींना शिवप्रेमींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे विरोधकांनी या कोसळलेल्या कमानीचे राजकारण सुरू केले आहे.परंतु संगमनेरच्या जनतेला आता कळून चुकले आहे तुमच्या ह्या कुठल्याही म्हणण्याला संगमनेरकर भीक घालणार नाही असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे भाजप शहर सरचिटणीस राहुल भोईर आणि भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शशांक नामन आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी विरोधकांवर केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!