गुहा (जनता आवाज वृत्तसेवा):- जिथे जिथे नाथांचं ठाण आहे त्या सर्व स्थानांचा पवित्र जपलं पाहिजे तसेच त्या स्थानाचा जीर्णोद्धार करून सर्व नाथ भक्तांना दर्शनाचा लाभ घेता आला पाहिजे. अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्त सरला बेट चे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
गुरुवारी दुपारी बरोबर साडेतीन वाजता महंत रामगिरी महाराजांचे गुहा येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजी त्यांचे स्वागत करण्यात आले व एका भव्य अश्या आलीशान ओपन कार उभे राहून सर्व नाथ भक्तांना अभिवादन करत करत हायवे लगत असलेल्या कानिफनाथ मंदिर स्वागत कमानी पासुन ते कानिफनाथ महाराज मुख्य मंदिरापर्यंत मोठया जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली . याप्रसंगी नाथ भक्तांनी नाथांचा जयघोष करत महाराजांवर मोठया प्रमाणात फुलांची उधळण केली.
या प्रसंगी त्यांनी वक्फ बोर्डावर देखील निशाणा साधला वक्फ म्हणजे दान.दान केलेल्या जमिनीचे नियोजन करण्यासाठी या बोर्डाची स्थापना केली होती परंतु सध्या त्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे निदर्शनास आणून दिले दिसेल त्या जागेवर आपला हक्क दाखवून ती जागा ताब्यात घेऊन त्याचा गैरवापर करणे हा सध्या त्यांचा नित्य नेम झाला आहे. जागा दान मिळाल्याचे कागदपत्रे दाखवा किंवा कायदेशीर कागदपत्रे दाखवा अन्यथा त्या सर्व जागा सरकारने ताब्यात घ्याव्यात असे आवाहन सरकारला याप्रसंगी त्यांनी केले.
हा वक्फ बोर्ड नसून हा भूमाफिया बोर्ड आहे असे याप्रसंगी त्यांनी सांगितले.आम्ही देशात सरकारी यंत्रणा,न्यायालय यांनाच सर्वोच्च मानतो परंतु इथे तर हम बने सौ कायदा चालू आहे सर्वोच्च न्यायालयाला देखील हे लोक जुमानत नाहीत हे यापुढे चालणार नाही सरकारने यापुढे याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी असे त्यांनी म्हंटले आहे. गुहा येथील कानिफनाथ मंदिराच्या जागेवर देखील अशाच प्रकारचा वाद कोर्टात चालू आहे यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असे याप्रसंगी त्यांनी ठणकावून सांगितले.
तसेच महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारचा अन्याय झाल्यास मला फोन करा ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी मी तिथे निश्चितच धावून येईल. काळजी करू नका यासाठी महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभारण्याची वेळ आली तरी चालेल असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच येथे असलेल्या पोलीस प्रशासनाला देखील त्यांनी ठणकावून विचारले की तुमच्याकडे कोर्टाचा आदेश असल्याशिवाय किंवा वरिष्ठांचे पत्र असल्याशिवाय अशा प्रकारची कार्यवाही करू नये. सर्वच मुस्लिम बांधवांना मी दोष देत नाही सामान्य मुस्लिम बांधव हे रोज आपले नित्य काम करून आपली उपजीविका चालवत असतात ते देखील यात भरडले जातात.
त्यांनी देखील आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून यापुढे वागावे. कानिफनाथ यात्रा उत्सवाचे इतके सुंदर आयोजन व नियोजन केल्याबद्दल कान्होबा देवस्थान ट्रस्ट तसेच यात्रा उत्सव कमिटीच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचे व सर्व ग्रामस्थांचे भरभरून कौतुक केले. प्रवचनास नाथ भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती.