21.2 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

बेलापूरच्या ग्रामसभेत जोरदार खडाजंगी;मध्यस्थी करत वाद मिटवल्यानंतर सभा शांततेत

श्रीरामपुर (तालुका प्रतिनिधी ): आर्थिक नियोजना बाबत बेलापुर ग्रामपंचायतीने केव्हा ग्रामसभा घेतली? विरोधी सदस्यांना का बोलविले नाही ? असे आरोप ग्रामसभेत करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावर सरपंच-उपसरपंच यांनी आक्रमक होत प्रतिउत्तर दिल्याने ग्रामसभेत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी मा. जि प सदस्य शरद नवले यांनी मध्यस्थी करुन वादावर पडदा टाकल्यानंतर बेलापूर ग्रामपंचायतची ग्रामसभा शांततेत पार पडली. बेलापुर ग्रामपंचायतीची ग्रामसभा मराठी शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते. ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी मागील सभेचे प्रोसिडींग वाजण्यास सुरुवात केली त्यावेळी ही सभा केव्हा घेतली आम्हाला निरोप का दिला नाही ?असा सवाल सदस्य भरत साळूंके, रविंद्र खटोड यांनी केला. त्यावर वाद सुरु झाला या वादात उपसरपंच अभिषेक खंडागळे,प्रफुल्ल डावरे,मोहसीन सय्यद यांनी तुम्ही मागे काय केले ते पण सांगा असे सुनाताच वातावरण चांगलेच तापले.त्यामुळे पोलीस देखील तातडीने ग्रामसभेत हजर झाले. जि प सदस्य शदर नवले यांनी मध्यस्थी करत काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करु असे सांगुन तो विषय थांबविला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या १५ टक्के निधी मागासवर्गीयासाठी खर्च करणे गरजेचे असताना तो  का केला नाही असा सवाल विजय शेलार यांनी केला.चंद्रकांत नाईक यांनीही दलीत वस्तींना न्याय द्यावा अशी मागणी केली. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील मागसवर्गीय निधी वाटप झालेले नाही असा खुलासा केला. सरपंच महेंद्र साळवी यांनी विविध मागण्या आणि प्रश्नांवर कार्यवाही करू असे सांगितले.या वेळी पत्रकार देविदास देसाई यांनी बेलापुर ग्रामपंचायतीचे शतक महोत्सवी वर्ष असुन पाणी पुरवठा योजनेकरीता १२६ कोटी रुपये निधी मिळविणारी पहीली ग्रामपंचायत ठरली असुन या योजनेकरीता पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा, खासदार सदाशिव लोखडे,आमदार लहु कानडे तसेच दिपक पटारे, शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे  या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. टाळ्याच्या गजरात त्यास मंजुरी देण्यात आली. मा.जि प शरद नवले यांनी १२६ कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा  योजनेची सविस्तर माहीती दिली.पाणी पुरवठा योजनेकरीता जमीन मिळावी या करीता उच्च न्यायालयात दावा दाखल करणारे विलास मेहेत्रे, संजय शिरसाठ, मुस्ताक शेख यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच नविन पाणी पुरवठा योजनेतील टाक्यासाठी  जागा देणारे माधव कुऱ्हे,प्रकाश मेहेत्रे,नामदेव मेहेत्रे, मनोज मेहेत्रे,जनार्धन दाभाडे यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी तबस्सुम बागवान सौ शिला पोळ स्वाती आमोलीक प्रियंका कुऱ्हे जालींदर कुऱ्हे  प्रकाश नवले लहानु नागले भाऊसाहेब तेलोरे दत्ता कुऱ्हे  प्रकाश नवले प्रभाकर कुऱ्हे  विशाल आंबेकर अमोल गाढे अजिज शेख अय्याज सय्यद जाकीर शेख भाऊसाहेब कुताळ महेश कुऱ्हे सचिन वाघ सुरेश कुऱ्हे आदिसह ग्रामस्थ महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!