25 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

टाकळीभान येथे विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

टाकळीभान( वार्ताहर ):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे शिवसेना कार्यालय, बस स्थानक परिसर, ग्रामपंचायत, टाकळीभान सोसायटी, शिव शंभो फिटनेस क्लब आदी ठिकाणी छत्रपती शिवाजी
महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 शिवसेना कार्यालयात श्री. क्षेत्र देवगड संस्थानचे
प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर तालूका प्रमुख दादासाहेब कोकणे, जेष्ठनेते राधाकृष्ण वाघुले,
राजेंद्र कोकणे, पाराजी पुंड, नानासाहेब ब्राम्हणे, भारत
परदेशी, भाऊसाहेब मगर, गजानन कोकणे, सुबोध माने, बबलू वाघुले, रणजीत कोकणे, सोमनाथ पाबळे उपस्थित होते.
      बसस्थानक परिसरात माजी सभापती नानासाहेब
पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, राहूल पटारे, अक्षय कोकणे, भाऊसाहेब पवार, अविनाश लोखंडे,
अनिल दाभाडे, सतीश रणनवरे, राहूल कापसे, विलास
सपकाळ, सुजित गोंडे, गौरव चितळे, केतन शिंदे आदी
उपस्थित होते.
       ग्रामपंचायतमध्ये सरपंच अर्चना रणनवरे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी
जेष्ठनेते ज्ञानदेव साळुंके, शिवाजीराव शिंदे, दत्तात्रय नाईक, यशवंत रणनवरे, मयुर पटारे, भाऊसाहेब पटारे
शिवाजी पवार, संजय पटारे, पाराजी पटारे, रावसाहेब
वाघुले, बापूसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
       टाकळीभान विविध कार्यकारी सोसायटीमध्ये 
जिल्हा सहकारी बँकेचे शाखाधिकारी पराग ढुमणे व
शंकरराव पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी बाबासाहेब बनकर, विजय कोकणे, रामनाथ ब्राम्हणे, बाबासाहेब लोखंडे, संदिप शिनगारे, भारत भवार, बाबाससाहेब तनपुरे आदी
उपस्थित होते.
        शिवशंभो फिटनेस क्लब मध्ये अशोक शिंदे व 
अशोक पटारे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी सुरेश पवार, जितेंद्र पटारे, मगर, अॅड. दिपक कोकणे, गणेश कोकणे, अनिल
बोडखे, गणेश कोकणे, बंडू हापसे, सुरेश गलांडे आदी उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!