कोल्हार प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कोल्हार भगवतीपुर मध्ये अंगावर शहारे आणणारे देखावे, भरघोस बक्षिसांचा वर्षाव, शिवकालीन वेशभूषेतील नाटिका, पारंपरिक वाद्य यांमुळे अवघी शिवसृष्टी प्रकट झाली होती. त्यामुळे यावेळच्या शिवजयंती उत्साहात हिंदवी स्वराज्य सोहळाच जणू साजरा झाला.
गत आठ दिवसांपासून शिवजयंती निमित्त जणू शिवजयंती सप्ताहाचा साजरा झाला. विविध सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक व विविध विद्यालयाने साजरे केलेले शिवकालीन देखावे, तानाजी मालुसरे, बाजीप्रभूंची पावनखिंड आशा विविध ऐतेहसिक नाटिका मुळे जणू कोल्हार भगवतीपुर मध्ये शिवसृष्टी अवतरली होती.
प्रतिवर्षी कानाचे पडदे फडणारा डिजे मात्र यावेळी दिसलाच नसल्याने ग्रामस्थसुद्धा सुखावले होते. डिजे मुक्त शिवजयंती यावेळी प्रथमच झाली. कोल्हार बसस्थानक आवारात विस फुटी अश्वारूढ पुतळा सर्वांचेच आकर्षण ठरले. अवघे गांव भगवेमय झाले होते. मात्र झेंड्याची स्पर्धा टाळण्यासाठी यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा झेंडे लावले गेले नाहीत. हा उत्कृष्ट संदेश शिवजयंती महोत्सव समितीने ग्रामस्थांना नक्कीच दिला.
शिवजयंतीला झालेल्या कार्यक्रमात भव्य दुचाकी फेरी, पारंपरिक विद्यातील मिरवणूक, शिवरायांचा जयघोष करणारी तरुणाई असा अस्सल महाराष्ट्रीयन शिवकालीन शिवजन्मोत्सव यावेळी साजरा झाला. सदर उत्सवासाठी शिवजयंती महोत्सव समितीने अथक परिश्रम घेतले.
{परिसरातील महाविद्यालयाने शिवजयंतीची शोभा वाढविली. गावामध्ये छत्रपतींचे स्मारक होऊन पुढील शिवजयंती तिथेच साजरी व्हावी. याकरिता ना.राधाकृष्ण विखे, खासदार डॉ सुजय विखे यांना निवेदन दिले आहे. याचा पाठपुरावा करून एक वर्षात शिवस्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.}
:- ॲड सुरेंद्र खर्डे पा. ( मा. सरपंच कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत )