4 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

अहमदनगर शहरात सीसीटीव्ही कामाचा शुभारंभ शिवसृष्टीच्या माध्यमातून भावी पिढीला प्रेरणा मिळेल-खा.डाॅ.सुजय विखे पाटील

अहमदनगर (प्रतिनिधि):-छत्रपती शिवाजीमहाराज यांनी रयतेसाठी केलेले कार्य हे भावी पिढीला कायम स्मरणात राहून यापासून त्यांनी प्रेरणा घेत आपले आचरण करावे या करिता शिवसृष्टीची निर्मिती केली असल्याचे दक्षिण नगरचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले, ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीच्या निमीत्ताने नगर शहरातील उड्डाणपुलावर तैलचित्रात निर्माण केलेल्या शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. 
  यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी ताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले तसेच पदाधिकारी, अधिकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीमहाराज यांचा दैदीप्यमान असा इतिहास आहे, या इतिहासाचे कायम स्मरण हे येणारया पिढीला राहावे या करिता या शिवसृष्टीची अनेक नामवंत कलाकारांच्या माध्यमातून तैलचित्रात निर्मिती केली. यात प्रामुख्याने शिवरायांचे बालपण, न्यायदान, महिलां प्रती असलेला आदर,शिवराज्याभिषेक, युध्द प्रसंगाचे अत्यंत सुबक आणी सुरेख तैलचित्र काढण्यात आली आहेत. उड्डाणपुलावरील ही शिवसृष्टी कायम येणारया जाणारयाच्या दृष्टीस पडेल.
 खासदार विखे यांनी शिवजयंतीचे औचित्य यास खास असे म्हणावे लागेल. या बरोबरच नगर शहरात सुरक्षितता वाढावी , कुठलाही अन्याय-अत्याचार होऊन नये या करिता पहिल्या टप्प्यात 150 सीसीटीव्ही बसविण्यात येत असलेल्या कामाचे शुभारंभ याच निमीत्ताने आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हेगारावर अंकुश राहावा, झालेल्या गुन्ह्याची तात्काळ उकल व्हावी आणि गुन्हेगारावर पोलीस प्रशासनाची पकड आधिक घट्ट व्हावी हा हेतु असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. संपूर्ण शहरात तसेच शहराच्या सीमारेषेवर चौहोबाजूनी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्याच बरोबर दुसरया टप्प्यात अजून 150 सीसीटीव्ही  शहराच्या कानाकोपऱ्यात बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 येत्या 2024 मध्ये श्रीरामाचे मंदिर दर्शनासाठी सर्वांसाठी खुले होईल असे सांगताना सध्या आयोध्यास जाणारया प्रत्येक व्यक्तीस प्रभू रामचंद्राची प्रतिमा असलेली शाल ही देण्यात येत आहे. याचा लाभ प्रत्येक रामभक्तांनी घ्यावा असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या अभिवचनाची आता लवकरचं पुर्तता होईल असे आर्वजून सांगितले. 
  अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती भागातील उड्डाणपुलाच्या जवळ लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सोहळ्यास शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
 
    याप्रसंगी नगर शहरातील उड्डाणपुलाच्या खांबावर साकारण्यात आलेल्या शिवसृष्टी चित्रित  करणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!