लोणी दि.१९ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन सण आणि उत्सवाचा क्षण आहे. संपूर्ण जगात आपल्या कर्तृत्वाने आदर्श विचारांची किर्ती निर्माण करणा-या युगपुरूषाचा जयंती दिन यंदा प्रथमच आग्रा किल्यात संपन्न होणे ही सर्वांसाठीच ऐतिहासिक आणि अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंती दिनानिमित्त मंत्री ना.विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंती उत्सवाचा मुख्य सोहळा लोणी बुद्रुक येथे संपन्न झाला. मागील ३३ वर्षापासून एक गाव एक शिव जयंती सोहळा साजरा करण्यात येतो. मंत्री ना.विखे पाटील आणि सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून महाआरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महराजांचा जयघोष करून या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
याप्रसंगी सोसायटीचे सरपंच श्रीमती कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, चेअरमन अशोकराव धावणे, गणेश मधुकर विखे, अनिल नानासाहेब विखे, अनिल एकनाथ विखे, राहुल धावणे, लक्ष्मण बनसोडे, प्रभाकर विखे, भाऊसाहेब विखे, शंकर विखे, भाऊसाहेब तुकाराम विखे, मयुर विखे, पंकज विखे, लक्ष्मण विखे, चांगदेव विखे, किशोर धावणे, नंदू राठी, विजय लगड, वसंतराव विखे, रामभाऊ विखे, वसंतराव विखे, नंदू राठी, भाऊसाहेब धावणे, अशोक धावणे, अॅड.नितीन विखे, संतोष विखे, भाऊसाहेब विखे, विखे आदिंसह ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवरा सैनिक स्कूल मधील विद्यार्थी, स्काउटचे गाईड विद्यार्थी, घोडेपथक आणि डॉ.विखे पाटील कारखान्याच्या बॅण्ड पथकाने पथसंचलन करून छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी दिली. आहील्याबाई होळकर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितीतांची मन जिंकली.
याप्रसंगी बोलताना ना.मंत्री विखे पाटील म्हणाले की, महाराजांचा जयंती दिन आम्हा सर्वासाठी सण आहे. संपूर्ण जगात आज महाराजांना अभिवादनाचे कार्यक्रम होत आहे. जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाने आणि आदर्श विचारांची किर्ती निर्माण करणाऱ्या युगपुरूषाचा जयंतीदिन यंदा प्रथमच आग्रा येथील किल्ल्यात संपन्न होत असलेला ऐतिहासिक सोहळा सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
लोणी खुर्द येथेही छत्रपती शिवाजी महाराजांना मंत्री ना.विखे पाटील यांनी पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले. या निमित्ताने पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक संजय आहेर, ग्रामपंचायत सदस्य मायकल ब्राम्हणे, शरद आहेर, रविराज आहेर, मंगेश आहरे, सचिन आहेर, सुशांत आहेर, गणेश आहेर, रविंद्र आहेर यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.