22.3 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

हवामान बदलले आहे निसर्गाच्या बरोबर राहून शेती करा- पंजाबराव डख

साञळ( प्रतिनिधी):-हवामान आधारित शेती करतांना पर्यावरणाचा ही विचार करा निसर्गाला घाबरू नका निसर्ग समजून घेत शेती करा. यापुढे शेती समोर संकटे असली तरी तो शेतकरी हा राजा आहे आणि राजाच असणार आहे. झाडे लावा पृथ्वीचे तापमान कमी करा असे प्रतिपादन हवामान तज्ञ आणि अभ्यासक पंजाबराव डख यानी केले. 
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय साञळच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 
आयोजित शेतकरी मेळाव्यात पंजाबराव डख बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण चोरमुंगे संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संचालक श्री. अप्पासाहेब दिघे, श्री. सुभाषराव अत्रे, विखे पाटील कारखान्याचे संचालक श्री.बाबुराव पलघडमल, श्री.सुभाष अंञे, श्री.बाळासाहेब दिघे, श्री.जे.पी. जोर्वेकर, श्री.दिलीप डुक्रे, श्री. नानासाहेब गागरे, श्री रंगनाथ दिघे,  सरपंच सतीषराव ताठे, प्राचार्य डॉ प्रभाकर डोंगरे आदी उपस्थित होते.
      आपल्या मार्गदर्शनात पंजाबराव डख  म्हणाले शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या विशेषात न जाता निसर्ग व्यामानातील चढ उतार समजून घेत शेती व्यवसाय करा. प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा निसर्गातूनच मिळत असतो पूर्वकडून वारे आले तर दुष्काळ पडत नाही. ज्यावर्षी गावरान आंबे कमी असतात त्यावर्षी पाऊस जास्त येतो. पृथ्वीचे वाढते तापमान  याविषयी चिंता व्यक्त करतांना तापमान कमी होण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज असल्याचे सांगून हवामानाचा अंदाज व्यक्त करतांना यावर्षी ८ जूनला पावसाचे आगमन होऊन २२ जुन ला सर्वत्र पाऊस पडले. शेतक-यांनी २६ जुन पर्यंत पेरणी करावी. शेतक-यांचे नुकसान कमी व्हावे यासाठी  हवामान अंदाज दिला जातो.असे सांगुन  पावसाचा अंदाज कसा घेतला जातो याविषयी मार्गदर्शन केले.
     प्रारंभी उपप्राचार्या डॉ.जयश्री सिनगर यांनी प्रास्ताविकांत शेतकरी मेळावाचा हेतु विषद केला. यावेळी   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुष मंत्रालय आणि महाविद्यालयाच्या वतीने औषधी रोपांचे वितरण उपस्थित शेतक-यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नवनाथ शिंदे आणि गायत्री म्हस्के यांनी तर आभार डॉ. दिपक घोलप यांनी मानले.
 
थंडी कमी होऊन पाऊस येणार..
आपल्या परिसरात  १८ फेब्रुवारी पासून उन वाढणार आहे. २५ फेब्रुवारीला पर्यत
 थंडी असेल २६ फेब्रुवारीपासून उन्हाळा सुरू होऊन २८ ते ३ मार्च पर्यत पाऊस राहील असा १५ दिवसाचा अंदाजही व्यक्त केला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!