कार्यकारी संपादक- महेश रकताटे
अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार सध्या गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर.आलेला आहे. कार्यालयांतर्गत असलेली माहिती चारचौघात चर्चेली जात आहे. त्यामुळे या विभागात काम करायला नकोच असे कर्मचारी म्हणून लागलेले असून बदली करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अंतर्गत माहिती कार्यालयाबाहेरील लोकांपर्यंत पोहचविली जात आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. एकच कर्मचारी हा सर्व उद्योग करीत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.शिक्षण विभागात झालेल्या बैठका व ठरलेले धोरणात्मक निर्णय हे जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेरील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सध्या शिक्षण विभागातील व्यक्ती करीत आहे.
विशेष म्हणजे पदोन्नती व इतर बदल्यांच्या प्रक्रियेतही कोणाची बदली कशी झाली, कोठे गडबड झालीच याबाबतची सविस्तर माहिती सध्या जिल्हा परिषदेतील कर्मचारीच बाहेर पुरवित आहे. त्यामुळे प्रशासन अडचणीत येत आहे. ही बाब प्रशासनासह सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलेली आहे. आयुक्त कार्यालयापर्यंतही ही बाब पोचलेली आहे. परंतु कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिस्तभंगाची कारवाई करावीकार्यालयीन माहिती बाहेर देणे हा प्रकार क्षमास पात्र नाही. जे कर्मचारी अशी माहिती बाहेर देतात त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणे अपेक्षीत आहे. प्रशासनाने याबाबीचा विचार करून संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
आयुक्त कार्यालयांपर्यंत तक्रारीत्या कर्मचाऱ्याच्या उद्योगामुळे विनाकारण काही कर्मचारी अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे संतप्त होत काही कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयांपर्यंत त्या कर्मचार्याच्या कामाचा लेखाजोखाच सादर केलेला आहे, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे
जिल्हा परिषदेतील माहिती बाहेर पुरविली जात असल्याची चर्चेबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून विचार केली असता कर्चाऱ्यांमध्ये अशी चर्चा सुरु आहे. थेट तक्रारी कोणत्याच अधिकाऱ्याकडे झालेल्या नाहीत. चर्चेवर कारवाई करता येत नाहीत. परंतु ठोस तक्रारी आल्यानंतर निश्चितच कारवाई संबंधितावर होईल. असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.



