9.8 C
New York
Wednesday, November 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

पक्षपात न करता शिक्षकांचे प्रश्न सोडवणार- आ.सत्यजित तांबे

कोल्हार (प्रतिनिधी) :- कोल्हार येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लिश स्कूल मध्ये मतदाराचे आभार मानण्यासाठी आले तेव्हा ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच अँड सुरेंद्र पा. खर्डे हे होते.
 यावेळी  भगवतीपुरचे मा.उपसरपंच बी के . खर्डे, माजी विभागीय अधिकार भाऊसाहेब शिरसाठ ,मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईकवाडी सर ,न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य  सुधीर वाघमारे, पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे , प्राध्यापक सचिन खर्डे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी निकुंभ  आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माझे वडील माजी आ डॉ. सुधीर तांबे यांनी मतदारसंघात जिव्हाळ्याचे नाते जोडले .त्यांच्याच संस्कारात वाढलो असल्याने मी रयतेचा सेवक आहे .  शैक्षणिक क्षेत्रात तसेच आरोग्य क्षेत्रात खूप प्रश्न प्रलंबित आहेत. यावेळी जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक दर्जा  संदर्भात बोलताना म्हणाले की जिल्हा परिषद शाळेची शिक्षणाचा दर्जा  खालवलेला  आहे. शिक्षकावर अवातर भार आल्याने  विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा देखील खालावलेला आहे शिक्षण क्षेत्रात बदल करण्याची गरज असून त्यासाठी निधीची खूप आवश्यकता आहे .यासाठी राज्य सरकारकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित पा तांबे यांनी  दिले 

अँड सुरेंद खर्डे पा म्हणाले, डॉ सुधीर तांबे यांचे कोल्हार भगवतीपुरशी वेगळे नाते आहे. त्यांचे शिक्षण येथे झाले त्यांचे बालमित्र येथे आहेत. त्यांनी आजपर्यंत या गावाशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले नूतन आ. सत्यजित तांबे यांच्याकडूनही अशीच अपेक्षा आहे. काँग्रेसच्या गांधी कुटुंब यांचा वरदहस्त असलेलं हे तांबे कुटुंब असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक प्राचार्य सुधीर वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन रामदास तांबे यांनी केले. उपस्थितांचे आभार शब्बीर शेख यांनी मानले.

    

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!