कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त गावातून भव्य शांती यात्रा काढण्यात आली. यामध्ये ‘ शिवशंकर शक्ती ‘ चा जिवंत देखावा सादर करण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने ब्रह्मकुमार व ब्रह्मकुमारी बंधू – भगिनी सहभागी होते.
महाशिवरात्रीनिमित्त सकाळच्या सुमारास कोल्हार भगवतीपूर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती भवनमध्ये मेडिटेशन करण्यात आले. त्यानंतर कोल्हार बुद्रुकचे सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे यांच्याहस्ते शिवबाबांचे ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, संपतराव खर्डे, बाळकृष्ण चोरमुंगे, शिवाजी शेजुळ, ब्रह्मकुमारी पद्मावती बहेनजी, ब्रह्मकुमारी स्वाती बहेनजी आदी उपस्थित होते.
यानंतर गावातून शांती यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये शिव परमात्मा, भगवान शंकर महादेव, भगवती माता आणि भारत माता यांचा जिवंत ‘ शिवशंकर शक्ती ‘ देखावा सादर करण्यात आला. शांतीयात्रेचे ठिकठिकाणी पूजन व स्वागत करण्यात आले.