कोल्हार ( वार्ताहर ) :- शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनींचे नृत्य, सामूहिक नृत्य, गायन, नाटिका अशा निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण… त्यासोबत प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन… सरते शेवटी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन अशा विविधांगी कार्यक्रमांनी कोल्हार बुद्रुक येथील गुरुकुल संपदा स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल परब स्कूलचे संचालक डी. एच. परब हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कर्नल परब स्कूलच्या सीईओ सौ. गीता परब, डॉ. गौतम आहेर, डॉ. सुभाष वैद्य, डॉ. सुनील खर्डे, डॉ. नितीन कुंकूलोळ, डॉ. सुरेश गुंड, प्रा. विशाल तिडके, समिंद्रा फाउंडेशनचे सदाशिव थोरात, सेवानिवृत्त वन अधिकारी भगीरथ निमसे, ॲड. संपतराव खर्डे, सौ मंदाताई खर्डे, श्रीमती लताताई आहेर आदी व्यासपीठावर विराजमान होते.
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. गुरुकुल संपदा स्कूलचे अध्यक्ष सुधीर आहेर यांनी प्रास्ताविक केले. गुरुकुल संपदा स्कूलच्या सचिव सौ. सारिका आहेर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून वार्षिक अहवाल वाचन केले. यावेळी डी. एच. परब, सौ. गीता परब, डॉ. सुभाष वैद्य, प्रा. विशाल तिडके, सदाशिव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. विविध गुणप्रदर्शन करणाऱ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्याात आले.
यानंतर गुरुकुल संपदा स्कूलच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपल्या अंगीभुत कलागुणांचे सादरीकरण केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.