spot_img
spot_img

गड आणि वडाच्या विकासासाठी भरीव निधी आणणार – आ. खताळ पेमगिरीचा मोरदारा पाझर तलाव व महा काय वटवृक्षाची आ. खताळ यांनी केली पाहणी

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झाले ल्या शहागड आणि पर्यटकाचे आकर्षण ठरलेल्या पेमगिरीचा महाकाय वटवृक्ष परिसराचा विकास करण्यासाठी भरीव निधी आणणार अशी ग्वाही आ. अमोल खताळ यांनी पेमगिरी ग्रामस्थांना दिली.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडाच्या विकासाबाबत आ अमोल खताळ यांनी विधिमंडळात सर्वप्रथमच मुद्दा उपस्थित करत विधानसभेचे लक्ष वेधले. त्याबद्दल प्रेमगिरी ग्रामस्थांच्या वतीने आ. अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे,  दादाभाऊ गुंजाळ ,उपाध्यक्ष अशोक कानवडे,भाजप युवा मोर्चा जिल्हा उपा ध्यक्ष दिलीप कोल्हे, ऍड ज्ञानेश्वर सहाने जेष्ठ नेते रावसाहेब डुबे,माधव चव्हाण साहेबराव वलवे, सोमनाथ कानवडे,रविंद्र देशमुख,राजू डुबे शरद डुबे,दत्ता शेटेरविंद्र डुबे ज्ञानेश्वर चव्हाण,प्रा रोहिदास डुबे निलेश डुबे निखिल दीक्षित,संजय पावसे आदी मान्यवर उपस्थित होते

आ. खताळ म्हणाले की या भागातील शहागड तसेच महावट वृक्षाचा पर्यटन विकासात समावेश करण्यासाठी पर्यटन विकास मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केला आहे.त्यामुळे या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही याची तुम्ही काळजी करू नका. मोठ्या प्रमाणात निधी आणून या भागाचा विकास करणार असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

पेमगिरी आणि परिसरातील वाड्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोरदरावाडी पाझर तलावाच्या वरील व खालील शेतकऱ्यांशी समन्वय साधून त्यातून मार्ग काढला जाईल.तसेच या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरदरावाडी पाझर तलावाचा जलसंपदामंत्री ना राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून प्रश्नमार्गी लावून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध राहू असा विश्वास आ.खताळ यांनी या भागा तील जनतेला दिला. जवाहरलाल नेहरू विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊनमान्यवरांचे स्वागत केले.

सूत्रसंचालन संजय पावसे यांनी केले व आभार ऍड ज्ञानदेव सहाणे यांनी मानले संपत दुबे ,राजू कोल्हे, शरद नाना डुबे ,विठ्ठल पावसे ,उत्तम गपले, वाल्मीक कोल्हे ,प्रा प्राध्यापक रोहिदास कोल्हे सर. सखाराम शेटे. सुदर्शन शेटे. शिवाजी डुबे. भाऊसाहेब गडकरी. संपत महाराज डूबे.अप्पासाहेब गोडसे. कचरु गोडसे, शांताराम गोडसे.संजय अगविले आगिविले,दिलीप भुतांबरे. बबन भुतांबरे. उमाजीराजे नाईक तरुण मित्र मंडळ येळुशी तरुण मित्र मंडळ,चंदनगड तरुण मित्र मंडळ ,मोरदरा तरुण मित्र मंडळ. महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि समस्त ग्रामस्थ पेमगिरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!