spot_img
spot_img

सात्रळ महाविद्यालयात फार्मा जॉब रेडीनेस ट्रेनिंग प्रोग्राम यशस्वीरित्या संपन्न

सात्रळ( जनता आवाज वृत्तसेवा):-प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या विकासात नेहमीच अग्रेसर राहिली आहे . विद्यार्थ्यांच्या सुप्त कौशल्याधिष्ठीत क्षमतांचा विकास करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात, यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विद्यार्थ्याचे मनोबल वाढवणे आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे हा हेतू असतो.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ ( ता. राहुरी) येथे ट्रेनिंग प्लेसमेंट सेल अंतर्गत शोध ॲडव्हान्टेक छत्रपती संभाजीनगर येथे एम. एस्सी केमेस्ट्रीच्या २१ विद्यार्थ्यांनी नुकताच “फार्मा जॉब रेडीनेस ट्रेनिंग प्रोग्राम” यशस्वीरीत्या पूर्ण केला.

पारंपरिक अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थी जेव्हा मार्केटमध्ये नोकरीसाठी प्राप्त करतात त्यावेळेस त्याला या ट्रेनिंगचा खूप फायदा होतो. कारण इंडस्ट्रीमध्ये लागणारे सर्व इन्स्ट्रुमेंट हाताळण्याचे कौशल्य या ट्रेनिंगमध्ये शिकविले जाते. तसेच इंटरव्यूची तयारी करून घेतली जाते. मॉक इंटरव्यू आयोजित केल्या जातात. त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे एच.आर. बोलवले जातात. आणि म्हणूनच असे ट्रेनिंग केल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही कार्पोरेट क्षेत्रात नोकरी मिळविणे सुलभ होते.सदर ट्रेनिंग प्रोग्राम काकडे योगीराज धनंजय, वाणी हर्षल सोपान, पठारे गौरव सुरेश, कासार संकेत पांडुरंग, शिंदे आदित्य शिवाजी, कदम आशिष अभिजीत, नेहे प्रमोद आण्णासाहेब ,जाधव किशोर राजाराम ,मुसमाडे दीपक अनिल, क्षीरसागर ज्ञानेश्वर शांताराम, डुक्रे गौरव अजय ,गागरे रचना विनायक, वाणी ऋतुजा जयराम, वाणी अश्विनी बाबासाहेब, घोरपडे निकिता संजय, गागरे पल्लवी आण्णासाहेब ,व्यवहारे मोनाली मधुकर ,सिनारे तृप्ती सुनील. नागरे मयुरी अशोक ,सिनारे महेश बाळासाहेब आणि ताठे आदित्य बच्चू यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला.

याबद्दल शोध ॲडव्हान्टेक छत्रपती संभाजीनगर येथील रजनी मुद्कवी आणि मैत्रय मुद्कवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, रसायनशात्र विभागप्रमुख डॉ. अमित वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंटच्या सेलच्या समन्वयक सौ.छाया शरदचंद्र कार्ले यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाध्यक्ष सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मा. मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव श्री. भारत घोगरे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, पंचक्रोशीतील कार्यकर्ते आणि पालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिंनगर, सहकारी प्राध्यापक, सेवक वृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!