spot_img
spot_img

कोल्हारमध्ये अनोख्या पद्धतीने रमजान ईद साजरी…

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार येथील लक्ष्मीबाई झुंबरलाल कुंकूलोळ संकुलामध्ये येथील 131 फ्लॅट्स च कुटुंब असलेल्या येथील लक्ष्मीबाई झुंबरलाल कुंकूलोळ संकुलामधे संपूर्ण समाजाला समानतेची व एकतेचा संदेश देणारी अनोखी घटना ईद-ए-मिलाच्या पावन पर्वावर येथील संकुलवासीयांना अनुभवास मिळाली. 

दि. 10 एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता येथील मुस्लिम संकुलवासी आसिफ भाई शेख, फैजल भाई, रिजवान भाई,सय्यद पप्पू बिल्डर भाई, तसेच संकुलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक इलियास भाई व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून संकुलातील सर्व रहिवाशांसाठी रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. संकुलात सर्व प्रकारच्या जाती-धर्माच्या लोकांना मोठ्या आत्मीयतेने फोन करून प्रत्यक्ष भेटून आग्रहाचे निमंत्रण दिले होते.त्यामुळे 131 फ्लॅटच्या या छोट्याशा गावात गेली दहा वर्षापासून गुण्या गोविंदाने राहत असलेले सर्व रहिवासी यात आनंदाने सहभागी झाले होते.

वेगवेगळे वेगळ्या प्रकारची फळ ज्यूस तसेच मुस्लिम महिला भगिनींनी मेहनत घेऊन प्रेमाने तयार केलेले पदार्थ व आग्रहाने देण्यात आलेलल्या अल्पोहाराने सर्वांचे मन तृप्त झाले होते. सर्वजण एकमेकांची खरोखर एक कुटुंब असल्यासारखं अत्यंत आपुलकीने चौकशी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. व आजूबाजूला असलेली सर्व बालगोपाल लहान मुले मोठ्या कुतूहलाने या गोष्टी पाहत होते.

यानिमित्ताने त्यांच्यावर देखील एक चांगली संस्कार होत असल्याचे निरीक्षण येथील संकुलाचे अध्यक्ष प्रा. डॉ.नवनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले त्यांच्या मतानुसार अशा प्रकारचे आयोजन नियोजन केल्याने समाजामधील एकमेकांच्या विचारांची दरी संपून बंधुभाव निर्माण होतो तो आदर्श आज आपल्या संकुललाने समाजाला घालून दिला आहे असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी संकुलातील एक जबाबदार व्यक्तिमत्व संकुलाचे खजान खजिनदार पत्रकार राहुल गाडेकर आपले मत व्यक्त करताना म्हणाले की साईबाबा हे माझे गुरु आहेत व त्यांनी सबका मालिक एक हा संदेश जगाला दिला आहे या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण एकाच पित्याची संतान असून आपल्यामध्ये बंधुभावाचे नाते आहे परंतु काही मोजक्या लोकांमुळे दोन समाजामध्ये वैचारिक मतभेद पसरविले जात असल्याने दरी निर्माण होते व आशा कार्यक्रमामुळे एकमेकांमध्ये चांगले बॉण्डिंग होऊन एकता निर्माण होते.

या संकुलाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी येथे सण मोठ्या उत्साहात एकत्रितपणे साजरी केली जातात विशेषतः गणपती मंडळ स्थापन करून गणपती बसविणे यामध्ये दहा दिवस सामाजिक प्रबोधन करणारे विषयांची व्याख्याने पुणे मुंबई या शहराप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे मुलांमधील सुप्त गुणांना वाव भेटतो तसेच या निमित्ताने संकुलामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोगी वृक्षांची लागवड केली जाते या सर्वांमध्ये येथील मुस्लिम समाज मोठ्या हिरहिरीने भाग घेऊन आपले योगदानही देतो अशा प्रकारचे दृश्य फार क्वचित ठिकाणी दिसते त्यामुळे संपूर्ण कोल्हार किंवा राहाता तालुक्यातच नाही तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात अशा प्रकारचे विविधतेमध्ये एकता असलेले संकुल पहावयास मिळत नाही. याचा आपल्या सर्वांना अभिमान असल्याचे मत पत्रकार राहुल गाडेकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ. अमित विलायते यांनी आयुर्वेद व कुरांण या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक इलियास भाई यांनी आशिया कार्यक्रमांच्या आयोजनाची समाजाला नितांत गरज असल्याची भावना व्यक्त केली.

याप्रसंगी मोरे यांनी संकुलात एकोपा कसा राहील या विषयावर मोठया आवेशाने सविस्तर भाष्य केले त्यांच्या या भाषणाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्योजक आशुतोष बोरसे गीताराम पवार  संकुलातील ज्येष्ठ मार्गदर्शक भंडारी काका यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शेवटी या कार्यक्रमाचे आयोजक आसिफ भाई शेख यांनी विनंतीला मान देऊन आलेल्या सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले.

याप्रसंगी  महेश फलटणे, गणेश सोमवंशी, श्रीकांत थोरात, संजय दळवी, विशाल शिंदे, राजेंद्र पवार सर, गागरे  सर,दरंदले सर, ठाणगे , उद्योजक विनय पटेल, प्रफुल पटेल,सोनवणे काका,अनारसे काका,संचलाल गांधी, अभिजीत थिगळे, अमोल घोडके, निलेश कडू,कार्तिक चव्हाण आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!