2.5 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

अवघ्या तीन महिन्यांत करोडो रूपयांचा निधी, भ्रष्टाचार मुक्त कारभार – खा.डाॅ.सुजय विखे पाटील

अहमदनगर(प्रतिनिधि):केंद्रात आणि राज्यात गोरगरिबांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारे हे सरकार असून अवघ्या तीन महिन्यांतच विविध विकासात्मक कामासाठी करोडो रूपयांचा निधी आणल्याचे दक्षिण अहमदनगरचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्याचा विकास हेच आपले ध्येय असून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात विकासाची गंगा आपल्या दारी आणली असे सांगताना ज्यांनी मागील तीन वर्षांत एक रूपायाही आणला नाही ते आता या कामाचे श्रेय घेण्यासाठी उतावीळ झाले आहेत असे त्यांनी सांगितले. 

 ते जामखेड तालुक्यातील विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या समारंभास माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
   यावेळी पुढे बोलताना खासदार विखे म्हणाले की 2019च्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला घरोघरी स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा शब्द दिला होता, हाच शब्द त्यांनी पाळला असून जलजीवन मिशन या योजनेंतर्गत आता देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी त्यांनी दिले आहे. आपल्या जिल्ह्य़ात या योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन हजार कोटी रूपयांच्या योजनेचे काम सुरू आहेत.पुढील सहा महिन्यात सर्व योजना कार्यान्वित होतील असे विखे यांनी सांगतानाच राज्य सरकार देखील शासन आपल्या द्वारी ही योजना आणून आता एक रूपायाही खर्च न करता सर्व प्रकारची महत्वाची कागदपत्रे हे घरबसल्या मिळणार आहेत. भ्रष्टाचार मुक्त कारभार हा आपल्या करावयाचा असल्याचे त्यांनी या वेळी त्यांनी सांगितले. 
   येणारया काळात आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी तसेच शिंदे-फडणवीस सरकार यांच्या पाठीशी खंबीरपणानी उभे राहिले पाहिजे असे आवाहन शेवटी त्यांनी केले. 
    यावेळी माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे ही समायोजित भाषण झाले. 
या प्रसंगी अंबादास मिसाळ, सुनील गावडे ,श्रीधर पवार अशोकराव खेडकर , रवींद्र कोठारी, धनंजय मोरे तात्यासाहेब माने, साहेब काजी, युवराज शेळके ,सचिन पोटरे , स्मिता अनारसे जीवन साळुंखे, प्रशांत बुद्धिवंत गणेश क्षीरसागर सुनील यादव, अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!