25.2 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

महिलांच्या एकीतूनच सक्षमीकरणा बरोबरच सर्वांगीण विकास शक्य – माजी जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील

अहमदनगर (प्रतिनिधि):-देशात सध्या सर्वत्र महिला सक्षमीकरणाचे वारे वाहत आहेत, सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरिने प्रयत्न सुरू असून जो पर्यंत आपण एकत्र येऊन एकमेकीस सहकार्य करणार नाही तोपर्यंत आपला सर्वांगीण विकास होणार नाही, त्याकरिता सर्व महिलांनी एकत्र यावे असे आवाहन माजी जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले, त्या खेळ मांडियेला या कार्यक्रमात बोलत होत्या.

 

   साईज्योति स्वयंसहाय्यता यात्रा ,कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनात   महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ मांडियेला या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 
 या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हे सिनेअभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचे, या कार्यक्रमात बोलतांना त्या म्हणाल्या की घराचा कणा जशी घरातील कर्ती महिला असते तशी ती आता समाजकारणात,राजकारणात, प्रशासकीय सेवेत,आरोग्य सेवेत देखील महत्वाची असणे गरजे आहे. देशात महिला सशक्तिकरण आणि सक्षमीकरण प्रक्रिया जोरात सुरू असून आपण महिलांनी देखील एक पाऊल पुढे टाकून एकमेकीच्या सहकार्यातून आपला स्वतःचा विकास साधला पाहिजे,तरच खरया अर्थाने आपण सक्षम होऊत अन्यथा एकमेकीचे उणेदूणे काढू लागलो तर ते शक्य होणार नाही. एकत्र येऊ यात आणि आपल्या सह सर्वांचा सर्वांगीण विकास साधूयात असे याप्रसंगी उपस्थित महिलांना त्यांनी आवाहन केले. 
   खेळ मांडियेला कार्यक्रमाचे बहारदार संचलन करताना सिने अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करत करत विविध स्पर्धात्मक खेळ घेतले तर काही बौद्धिक खेळातून सहभागी महिलांचे मनोरंजन केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप,कृषी उपसंचालक रवींद्र माने,आत्माचे उपसंचालक राजाराम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 
या स्पर्धात्मक कार्यक्रमातून सहभागी महिला स्पर्धकांना संसारोपयोगी साहित्य हे बक्षीस म्हणून देण्यात आले तर मुख्य आकर्षण असलेल्या पैठणीच्या खेळातील विजेत्या स्पर्धकास मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. मनोरंजनात्मक कार्यक्रमात नगर येथील महिलां,तरूणींनी उस्फुर्त सहभाग नोंदविला होता. दोन मानाच्या पैठणीसह 25 वेगवेगळे बक्षीस याप्रसंगी देण्यात आले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!