कोल्हार ( वार्ताहर ) राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील खा. डॉ. सुजयदादा विखे पा. मित्र मंडळ, मराठा सेवा संघ, शिवजयंती उत्सव समिती व पाथरे बुद्रुक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवानिमित्ताने रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. पाथरे बुद्रुक येथील महिलांसाठी जनसेवा फाउंडेशनच्यावतीने आयोजीत स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
पाथरे बुद्रुक युवक मंडळाच्यावतीने करण्यात येत असलेल्या सामाजिक कामाचे सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी कौतुक केले. तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेल्या वयोश्री योजनेची माहिती त्यांनी दिली. देशाचे पंतप्रधान यांनी देशासाठी दिलेल्या निधीपैकी ६० कोटी रुपयांचा निधी सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हयास मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. गावातील सर्व घटकांच्या लोकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून गावाचा विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा बँकेचे माजी संचालक गंगाधर घोलप होते. पाथरे बुद्रुकचे सरपंच उमेश घोलप यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच डॉ. सुजय विखे पाटील मित्रमंडळाने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप घोलप यांनी केले.
याप्रसंगी एमपी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन आबासाहेब घोलप, बाळासाहेब घोलप, उपसरपंच आरिफ शेख, विखे कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब घोलप, गंगाराम कडू, प्राचार्य श्री. तांबे, किशोर कडू, मुन्ना शेख, संतोष घोलप, अवधूत कडू, सौरभ कडू, प्रवीण घोलप, मयूर घोलप, गणेश घोलप, आबा घोलप, संजय घोलप, सुनील घोलप, गौरव गोरे, रितेश चव्हाण, अमोल सजगुरे, ज्ञानदेव कडू, संतोष कदम, विष्णू घोलप, शिवाजी घोलप, श्रुती घोलप, रोहिणी कदम, ताराचंद कडू, गौरव सिनारे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.