spot_img
spot_img

श्री मळगंगा मातेच्या भव्य मानाच्या काठीची मिरवणूकीव्दारे उभारणी मानाची काठी दर्शनासाठी मंदिराजवळ उभारणी

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):- राज्यात जागृत व नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निघोज येथील श्री मळगंगा मातेला परवा शुक्रवारी हळद लावल्यानंतर , काल शनिवारी देवीच्या भव्य मानाच्या काठीची देवीचा जयघोष व विधीवत पूजा अर्चा करीत वाद्यांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून दर्शनासाठी श्री मळगंगा मातेच्या मंदिराजवळ भाविक भक्तांना ठेवण्यात आली आहे .

राज्यात प्रसिद्ध असलेली व नवसाला पावणारी म्हणून निघोज येथील श्री मळगंगा मातेची खूप मोठी आख्यायिका आहे . देवीच्या दर्शनासाठी वर्षभर देशभरातून लाखो भाविक भक्त नतमस्तक होण्यासाठी येतात . तदनंतर रांजण खळगे असलेल्या कुंड पर्यटन स्थळाला भेट देतात . श्री मळगंगा मातेच्या यात्रेला तर भाविक भक्तांच्या गर्दी चा महापूर लोटला जातो . यात्रेची शुभारंभ हा मातेला हळद लावण्यापासून होतो , तदनंतर दुसऱ्या दिवशी मानाच्या भव्य ८५ फुट उंचीच्या काठीची हजारो भाविक भक्तांनी मातेचा जयघोष करत वाद्यांच्या गजरात मिरवणूकी व्दारे घागरी साठी प्रसिद्ध असलेल्या हेमाडपंथीय बारवे जवळ काठीला मंत्रांच्या उच्चारात मातेचे पुजारी संतोष गायखे व परिवाराने अभ्यंग स्नान घालत , भंडारा उधळत मानाची काठी मिरवणूकी करिता सज्ज करून श्री मळगंगा मातेच्या मंदिरा जवळ उभारण्यात आली .

या भव्य मिरवणूकीत श्री मळगंगा मातेचे निघोज व परिसरातील भाविक भक्त मोठ्या भक्तीमय रूपाने खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले , त्यामुळे संपूर्ण परिसर भंडाऱ्याची उधळण करत , मातेचा उद्घोष करत भक्तीमय रसात तब्बल तीन तास न्हाऊन निघाला .

ही मानाची काठी उभारण्यात आल्यानंतर निघोज परिसरातील शेतकरी शेतीच्या मशागतीचे कामे थांबवितात , पशू हत्या , मांसाहार पुर्ण बंद केला जातो , ही अनेक वर्षांपासून चालत आलेली रुढी परंपरा सर्व जण आज ही मनोभावे पाळतात , हे वैशिष्टये म्हणावे लागेल .

या कालावधीत निघोज परिसरातील पोटापाण्यासाठी व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी असणारे ग्रामस्थ गावी येतात व यात्रेत सहभागी होऊन आनंद घेतात , त्यामुळे निघोज नगरी परिसर अक्षरशः गलबलून जातो . यात्रा म्हणजे येथील व्यावसायिकांची दिवाळीच मानली जाते . कोट्यावधी रुपयांची उलाढाल या निमित्ताने झालेली पाहायला मिळते .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!