अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने युवा सरपंच सचिन पोपटराव पालवे ग्रुप ग्रामपंचायत उदरमल- सोकेवाडी यांना राज्यस्तरीय “आदर्श सरपंच पुरस्कार” दि. 13 रोजी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या शुभहस्ते माऊली संकुल अहिल्यानगर येथे प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सिने अभिनेते मकरंद अनासपुरे आपल्या भाषणामध्ये म्हणाले की, सरपंच हा त्या गावचा पालक असतो समाजातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी लोकांना सहकार्य करणे आवश्यक असते जल, जमीन व झाडे हे तीन मार्ग खेड्यांचा कायापालट करू शकतात विज्ञानामुळे कालांतराने अनेक अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे खेड्यांचा विकास हाच देशाचा विकास आहे म्हणून खेड्यांचा विकास झाला पाहिजे याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक यादवराव पावशे म्हणाले की, सरपंच हा त्या गावच्या अडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतात परंतु सरकार त्यांना फार कमी मानधन देतो हे मानधन भरपूर वाढले पाहिजे.
कोट्यावधी रुपयांची कामे सरपंच स्वतः जातीने लक्ष घालून करून घेतात त्यातून जनतेचाही फायदा होतो पण सरपंचांना फार कमी मानधन मिळते याप्रसंगी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे, एकनाथराव ढाकणे युवा नेते सरपंच सेवा संघ रोहित पवार व महाराष्ट्रतुन अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
युवा सरपंच सचिन पोपटराव पालवे यांनी राजकीय त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा नेहमी अग्रेसर आहेत. राजकीय जबाबदारी असतानाही त्यांनी समाजातील घटकांना ज्या अडचणी येत असत त्याकरिता त्यांनी पत्रकारितेचा जोड ठेवला आहे. त्यामुळे ते कमी कालावधीमध्ये नगर तालुका त्याचबरोबर नगर शहरांमध्ये उत्कृष्ट असे पत्रकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.