22.4 C
New York
Wednesday, August 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

लोकसंस्कृतीचे अभ्यासक व लेखक डॉ. प्रभाकर मांडे ह्यांना केंद्र सरकारने पद्मश्री उपाधीने स्नमानीत केले.महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जावून अभिनंदन केले.

नगर दि २९ प्रतिनिधी :
लोकसंस्कृतीचे अभ्यासक व लेखक डॉ. प्रभाकर मांडे ह्यांना केंद्र सरकारने पद्मश्री उपाधीने स्नमानीत केले.महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जावून अभिनंदन केले.डॉ प्रभाकर मांडे यांना सन्मानाने जिल्ह्याचा गौरव झाला असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्री विखे पाटील यांनी डॉ मांडे यांचा सत्कार करून त्यांच्या साहीत्य आणि सामाजिक संशोधनात केलेल्या कार्याला उजाळा दिला.डॉ.मांडे यांनीही लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या समवेतील असलेल्या आठवणीं सांगून विखे परीवाराशी असलेला  ॠणानुबंध बोलून दाखवला.
डॉ मांडे यांनी शब्दबध्द केलेल्या  पुस्तकांचा संच भेट दिला.सरांचे वय झाले असले तरी उमेद कायम असल्याची प्रतिक्रिया मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त करून अतिशय समर्पित भावनेन त्यांनी या साहीत्यसेवेला वाहून घेतले.भटक्या विमुक्त समाजाच्या विश्वाचा अभ्यास करताना संशोधनातून समोर आलेल्या बाबींवर व्यवस्थेला काम सुरू करावे लागले हे  त्यांचे योगदान आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत  त्यांना उतम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपाचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर शहराचे अध्यक्ष भैय्या गंधे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!