35.3 C
New York
Monday, June 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हार येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ):-अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्र, राजुरी रोड कोल्हार येथे रविवार दिनांक 20 एप्रिल ते शनिवार दिनांक 26 एप्रिल यादरम्यान श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त परमपूज्य श्री गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व मार्गदर्शनाने सामुदायिक श्री गुरुचरित्र वाचन,अखंड नाम जप यज्ञ प्रहर सप्ताह सुरु होत आहे.

सप्ताहच्या दरम्यान रोज भूपाळी आरती नित्यस्वाहाकार सामुदायिक गुरुचरित्र वाचन नैवेद्य आरती होऊन विशेष याग दुर्गा सप्तशती स्वामी चरित्रसारामृत पाठ होणार असून रोज सकाळी आठ ते संध्याकाळी आठ महिलांचे प्रहर दररोज संध्याकाळी आठ ते सकाळी आठ पुरुषांचे प्रहर सेवा होणार आहे.

शनिवारी 19 एप्रिल रोजी ग्रामदेवता पूजन व मंडल मांडणी होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि. 20 एप्रिल रोजी मंडळ स्थापना अग्नि स्थापना स्थापित देवता हवन व नित्यस्वाकार होईल.

गणेश याग चंडीयाग गीतायाग रुद्रयाग ही अतिउच्च कोटीची सेवा होणार असुन सर्व भाविक भक्तांनी या सर्व सेवेमध्ये भाग घेऊन परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, राजुरी रोड कोल्हार यांच्याकडून करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!