spot_img
spot_img

शिवांकुर विद्यालयाचे गणित प्राविण्य परीक्षेत यश

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा ):-अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळआयोजित गणित प्राविण्य परीक्षा विद्यालयात घेण्यात आली. या गणित प्राविण्य परीक्षेमध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवीचे 10 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.

यामधील साईयश सतीश काळे, रेवा कृष्णा गायकवाड, श्रावणी अशोक ढोकणे 3 विद्यार्थी राज्य प्रज्ञा पात्र झाले आहे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार व संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी राज्य प्रज्ञा पात्र विद्यार्थ्यांचे विद्यालयात कौतुक करून सन्मान केला तसेच पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धूमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे ,रोहिणी भाकरे, सुजाता तारडे, सुनिता ढोकणे, रूपाली रासने, अंजली धोंडे, दुर्गा बारवेकर, साक्षी शिंदे, रोहिणी हापसे, शिपाई शारदा तमनार परिवहन विभाग प्रमुख अशोक गाडे व बहुसंख्य पालक उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!