22.4 C
New York
Wednesday, August 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेवगाव मध्ये बहुजन समाजाच्या डोंबरी वस्ती मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

शेवगाव (प्रतिनिधी):- शेवगाव शहरातील यशवंत नगर येथिल डोंबारी वस्ती वर स्वातंत्र्यानंतर  पहिल्यांदाच झेंडावंदन साजरा करण्यात आला. त्यावेळी आदिवासी भटक्या व विमुक्त  सामाजिक संस्थे अंतर्गत आसरा बालसदन या निवारा वास्तुचे उदघाटनही करण्यात आले.
 बहुजनांचे नेते  बाळासाहेब गायकवाड, शेवगाव पोलीस स्टेशनचे   A.P.I श्री रविंद्र बागुल साहेब उपस्थीत होते. आसरा बालसदनच्या वतीने  आदिवासी, भटक्या व विमुक्त, ओबीसी व इतर मागासवर्गीय  समाजातील मुला व मुलीसाठी आसरा  केंद्र उभारण्यात आले . सदर ठिकाणी निराधार व अन्य  उसतोड मजर  परिवारातील मुले मुली यांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली  आहे.  समाजातील दान शूर व समाज संवेदना शिल व्यक्ती, संस्था यांच्या माध्यमातून विना अनुदित तत्त्वावर सुरू  करण्यात आले त्याचे उद्घाटन व झेंडावंदनाचे कार्यक्रम   API रविंद्र बगुल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी बागुल साहेबांनी  मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, अतिशय चांगला उपक्रम आहे. सदर मुलांसाठी वस्त्रदान व अन्नदान याकरिता मी सदैव तयार आहे. भुकेल्यांना नेहमी वस्त्रदान व अन्नदान केले पाहिजे. तसेच बहुजन समाजामधील मुलांमूलींना दर्जेदार व उच्च प्रतीचे शिक्षण मिळाले पाहिजे. याकरीता  समाजातील सर्व घटक वर्गाने एकत्रित मिळून काम केले पाहिजे. आदिवाशी भटक्या विमुक्त व OBC समाजातील मुलेमुली अत्यंत     
हुशार, काटक , व धाडसी असतात अशा  मुला / मुलींना सामाजिक प्रवाहात आणण्याचे काम बहुजनांचे नेते बाळासाहेब गायकवाड व त्यांची सहकारी करीत आहेत. ते खरोखरच अभिनंदानास पात्र आहेत या प्रसंगी आसरा बालसदनाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
 जेष्ठ कार्यकर्ते  उत्तमराव सावंत, नाथा बाबर, भिमराज चव्हाण, विजय सावंत उपस्थीत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बशीरभाई पठाण सचिन खंडागळे कृष्णा वाघ अंकुश वाघ गणपत सर्जे ,हरिभाऊ सर्जे, गणेश सर्जे, याचबरोबर प्रतिनिधी अक्षय  शिंदे, दत्ता शिंदे भैया शिंदे,सचिनचव्हाण, बाबासाहेब शिंदे संजय शिंदे, कैलास शिंदे, सुदाम चव्हाण, राजेंद्र चव्हाण, संतोष शिंदे, संजय बाबर, प्रकाश शेगर, प्रकाश भिमराव सावंत, बाबाजी शेगर इत्यादी पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी मुला/मुलीना खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले, प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अगदी आनंदात व उत्साहात  पार पडला. परीसरातील अनेक मोठ्या मान्यवरांची उपस्थिती होती. सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हणत तिरंग्याला सलामी दिली शेवटी बाबासाहेब शिंदे व उत्तम राव सावंत यांनी प्रमुख पाहून्याचा सत्कार  केला व उपस्थित सर्व मान्यवरांच्या आभार मानले .
 याचबरोबर सदर कार्यक्रमास किशोर पवार, सौ. संगीता गायकवाड, अमर गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड ,प्रज्ञा पवार,सौ पल्लवी पवार, वैजयंती वाघ, आलका वाघ, कमलाबाई वाघ, चंदा जाधव, सौ वैशाली अन्नदाते सयाबाई सूर्यभान जाधव संध्या वाघ हे सर्व उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!